Wed, May 12, 2021 02:10
कोल्हापूर कडक लॉकडाऊन; सोशल मीडियावर उलट सुलट प्रतिक्रिया

Last Updated: May 04 2021 4:13PM

कोल्हापूर: पुढारी ऑनलाईन

जिल्ह्यात गोकुळच्या निवडणुकीचा आज निकाल लागला. दरम्यान, प्रशासनाने कोल्हापूर जिल्ह्यात वाढती रूग्णसंख्या पाहता उद्यापासून पुढील १० दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सोशल मीडियावर  प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

 ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. हे वृत्त जिल्ह्यात वाऱ्यासारखे पसरले. वेळाने का होईला प्रशासनाला जाग आली असे म्हणत नेटिझन्सनी सोशल मीडियाद्वारे लॉकडाऊन विरोधात निषेध व्यक्त केला आहे. 

 

May be an image of ‎one or more people and ‎text that says "‎धूर्त राजकारण्यांचा निषेध कोल्हापूरचा कोरोना गोकुळ साठी थांबला होता का? שויירש‎"‎‎

May be an image of text

May be an image of one or more people and text that says "जनतेचा विचार न करता आपल्या सोईस्कर लॉकडाऊन निर्णय घेणाऱ्या प्रशासनाचा निषेध Shame OnG"

May be an image of text that says "गोकुळ इलेक्शन संपताच जिल्ह्याला कडक लॉकडाऊनची गरज आहे हे उमजल. असो...उमजल हेच खूप झालं. पण एक मात्र खरं... कायदा हा शेवटी जनतेला नाचविण्यासाठीच असतो. नर्तकीच्या रुपात सिहांसनावरील राजा जस नाच म्हणेल अगदी तस नाचाव लागत. मग पायाला पडलेली ती रक्ताळलेली भेगही मुकाट श्वास ताणून घेते. मग ते बंगाल असो... पंढरपूर असो...व वा कोल्हापूर"

May be an image of text that says "सोईनुसार करा लॉक डाउन"

May be an image of one or more people and text that says "कुणाची पण सत्ता येऊदे दूध आपल्याला विकतच मिळणार आहे"

जिल्हाधिकारी देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेले दोन दिवस रूग्णसंख्येत वाढ कमी असली तरी पॉझिटिव्ह दर कमी नाही. जिल्ह्यातील 2400 रूग्ण ऑक्सिजनवर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात सांगली, सिंधुदुर्ग, निपाणी, बेळगाव भागातील ऑक्सिजन जिल्हयातून पुरवला जात आहे. उद्या बुधवार दि. 5 मे सकाळी 11 पासून जिल्ह्यात पुढील 10 दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.