Sat, Dec 05, 2020 01:39होमपेज › Kolhapur › 'चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरातून पंचायत समिती सदस्य तरी निवडून आणता येईल का?'

'चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरातून आमदार सोडा पंचायत समिती सदस्य तरी निवडून आणता येईल का?'

Last Updated: Oct 24 2020 7:18AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा 

कोल्हापुरातून खासदार, आमदार निवडून आणण्याचे सोडा, साधा पंचायत समितीचा सदस्य तरी तुम्हाला निवडून आणता येईल का? असा सवाल एकनाथ खडसे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारला आहे. भाजपशी चंद्रकांत पाटील यांचा संबंध काय, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

अधिक वाचा : मंत्रिमंडळात फेरबदल नाही : पवार

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत कॅडबरी मिळते का लिमलेटची गोळी हे पाहावे लागेल. कारण खडसेंचा प्रवेश दोन तासांनी लांबला आहे. त्यांच्या पदाबाबात राष्ट्रवादीने निर्णय घेतलेला नाहीं तेव्हा तुमचे समाधान होईल असे काही केले जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर खडसे नाईलाजाने घराबाहेर पडल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.चंद्रकांत पाटील यांनी खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावर व्यक्‍त केलेल्या प्रतिक्रियेवर खडसे यांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

अधिक वाचा : शालेय शुल्कावरून दोन मंत्र्यांची दोन मते

कुल्फी चॉकलेटसाठीच पाटील भाजपत

भाजपने आपल्याला जे काही दिले आहे त्यासाठी 40 वर्षे पक्ष बांधणीसाठी आपण खर्च केली आहेत. तेव्हा आपण विद्यार्थी परिषदेत होता, असा चंद्रकांत पाटील यांना सांगताना खडसे म्हणाले की, तुम्हाला सगळे काही फुकटात मिळाले आहे. कुल्फी आणि चॉकलेट मिळावे, यासाठीच तुम्ही भाजपत आहात.

खडसे किती न्याय देतील हे दिसेलच 

भाजपमधून त्यांनी एक नाथाभाऊ खडसे यांना आकर्षण, आमिष दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले. भाजपमध्ये अन्याय होतो, असे सांगून राष्ट्रवादीने त्यांना घेतले. आता त्यांना किती न्याय देतात ते पाहू, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘पुढारी’शी बोलताना शुक्रवारी दिली.

अधिक वाचा : सिरम करणार पाच लसींची निर्मिती

खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज प्रवेश केला. गेले काही महिने खडसे पक्षनेतृत्वावर विशेषतः माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत होते. पक्ष सोडतानाही त्यांनी फडणवीस यांना लक्ष्य केले होते. यासंदर्भात पाटील म्हणाले, भाजपमध्ये सामूहिक निर्णय होतो. पक्ष मोठा आहे. एकटे फडणवीस निर्णय घेत नाहीत. खडसे यांना अन्य नेत्यांपुढे त्यांचे म्हणणे मांडता आले असते. त्यांच्याशी या संदर्भात आम्ही बोललो होतो. बिहार निवडणुकीनंतर मार्ग काढण्याबाबतही चर्चा झाली होती. फडणवीस यांनी त्यांची बाजू महिन्यापूर्वी दिल्‍लीत पत्रकार परिषदेत मांडली होती. खडसे यांना पक्षात थांबविण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला.

राष्ट्रवादी काँग्रेस नाथाभाऊंच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपवर वार करीत आहेत. यात रचनात्मकता कमी व डॅमेज जास्त आहे. नाथाभाऊ यांच्यामुळे राष्ट्रवादी किती वाढेल ते माहितीनाही; पण भाजपचे नुकसान होणार नाही. खडसे यांच्यासोबत कोणीही आजी-माजी आमदार जाणार नाहीत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.