होमपेज › Kolhapur › धनंजय महाडिकांच्या कार्यालयावरही 'कमळ' फुलले! (photo) 

धनंजय महाडिकांच्या कार्यालयावरही 'कमळ' फुलले!

Published On: Sep 01 2019 8:12PM | Last Updated: Sep 01 2019 8:14PM

धनंजय महाडिककोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक आपल्या दोन हजार कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी सोलापुरात दाखल झाले आहेत. आज (ता.१) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीतीत भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. 

कोल्हापुरातील कावळा नाक्यानजीक माजी खासदार धनंजय महाडिक यांचे कार्यालय आहे. त्यांच्या कार्यालयाबाहेर धनंजय महाडिक यांच्या भाजप प्रवेशाचा फलक लागला आहे. फलकावर त्यांच्या स्वतःच्या छायाचित्रासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय  गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे छायाचित्र आहे. 

महाडिक यांनी सोलापुरात प्रवेशासाठी दाखल झाल्यानंतर स्वकियांनीच मदत न केल्याने आपला पराभव झाल्याची प्रतिक्रिया दिली.स्वकीय विरोधात गेल्यानेच आपण भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असल्याची खंत माजी खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर शरद पवारांनी मात्र आपल्याला मदत केल्याचे त्यांनी नमूद केले. 

महाडिक यांच्यासोबत मातोश्री मंगलताई महाडिक, चिरंजिव पृथ्वीराज महाडिक, विश्‍वराज महाडिक यांच्यासह ताराराणी आघाडीचे १९ आणि भाजपचे १३ नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि त्यांचे समर्थक नेतेही सोलापुरात दाखल झाले आहेत. कोल्हापूर व सोलापुरातील मिळून त्यांचे 4 हजारांच्या आसपास समर्थक सोलापुरात आले आहेत.