Thu, Aug 13, 2020 16:25होमपेज › Kolhapur › मुस्लिम बांधवांनी कोरोनाबाधित मृत व्यक्तीवर केले अंत्यसंस्कार 

मुस्लिम बांधवांनी कोरोनाबाधित मृत व्यक्तीवर केले अंत्यसंस्कार 

Last Updated: Jul 15 2020 1:59PM
कोल्हापूर : एकनाथ नाईक 

कोल्हापूर जिल्हा बैतुल माल कमिटीने सामाजिक बांधिलकी जपत एका कोरोनाबाधित व्यक्तीवर हिंदू पध्दतीने अंत्यसंस्कार केले. कोल्हापूर जिल्ह्यातील एका व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला. त्या व्यक्तीवर पंचगंगा स्मशानभूमीत हिंदू पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी कोरोनापासून संरक्षणासाठी सर्व खबरदारी घेतली होती. उपस्थितांमध्ये एका महिलेचादेखील समावेश होता.

कमिटीचे सर्वेसर्वा जाफर बाबा यांच्या मार्गदर्शनाखील राजू नदाफ, जाफर मलबारी, तौफिक मुल्लाणी, अश्फाक नायकवडी, जाफर महात या मुस्लिम बांधवांनी कोरोना बाधित मृत व्यक्तीचे दहन केले. या बांधवांनी सामाजिक बांधिलकी जपत बंधुभाव, सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.  

या कमिटीमार्फत सीपीआरमध्ये अत्याधुनिक आयसोलेशन वॉर्ड उभे करण्यात आले आहे. कोरोना संकटात ही कमिटी सीपीआरमध्ये जेवण पुरवते. वेळप्रसंगी रूग्णास आवश्यक असणारे वैद्यकीय साहित्याचे पुरवठादेखील करते.