Sat, Jul 04, 2020 03:33होमपेज › Kolhapur › मुश्रीफांच्या 'पवार एके पवार' भूमिकेमुळेच कारवाई

मुश्रीफांच्या 'पवार एके पवार' भूमिकेमुळेच कारवाई

Published On: Jul 25 2019 6:46PM | Last Updated: Jul 25 2019 6:46PM
कोल्हापूर : प्रतिनिधी

दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार हसन मुश्रीफ यांना भाजप प्रवेश करण्याबाबत राज्यातील एका मातबर नेत्याने म्हटले होते. परंतु मुश्रीफ यांनी पवार एके पवार अशी भूमिका घेतल्याने कदाचित हे षड्यंत्र रचले असल्याचा आरोप जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी केला. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज (ता.२५) आयकर विभागाने छापे टाकले. यावेळी मुश्रीफ यांच्या घरासमोर कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. दरम्यान, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांनी या सूडाच्या पाठीमागे कोण कोण आहेत त्यांना कागल तालुक्याची आणि कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी जनता हसन मुश्रीफ यांचे काम माहीत आहे ती यांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे सांगितले. 

तसेच तमिळनाडू, कर्नाटक या राज्यात मात्तबर नेत्यांच्या घरांवर छापे टाकून दबाव टाकण्याचे काम गेली काही वर्षे सुरू आहे. आम्हाला पूर्ण खात्री आहे मुश्रीफ साहेब निर्दोष ठरतील.  घोरपडे कारखान्यावर सुद्धा त्यांनी छापा टाकल्याचे माहिती समजते. हा कारखाना भागातील जनतेने पै पै गोळा करून उभा केला आहे. मागच्या 4 वर्षांपूर्वी कोल्हापुरातील आयकर विभागाने याची चौकशी केली होती पण त्यात काहीच आढळून आले नव्हते. हा प्रकार घडला आहे त्याबद्दल मी निषेध करतो हा घडला प्रकार शाहू प्रेमी आणि कागल तालुक्यातील जनतेला वेदनादायी असल्याचे माने म्हणाले.