Mon, Jun 01, 2020 03:48होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : कोरोनामुळे गडहिंग्लज नगरपालिकेने घेतला 'हा' निर्णय (video)

कोल्हापूर : कोरोनामुळे गडहिंग्लज नगरपालिकेने घेतला 'हा' निर्णय (video)

Last Updated: Mar 28 2020 5:47PM

नगराध्यक्षा स्वाती कोरीगडहिंग्लज : पुढारी वृत्तसेवा

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळली असली तरीही लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळल्यामुळे कोरोना आपल्यापासून दूर नाही, अशाच भावना गडहिंग्लजकरांच्या झाल्या आहेत. तसेच शहरामध्ये कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी रविवार (दि. २९) ते मंगळवार (दि. ३१) पर्यंत गडहिंग्लज शहरात पालिकेने तीन दिवसांचा पालिका कर्फ्यू जाहीर केला आहे. यामध्ये औषध दुकाने वगळता एकही दुकान सुरू ठेवता येणार नाही, अशी माहिती नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी दिली आहे.

कोरोना : तीन महिने उशिरा व्याज भरणाऱ्या कर्जदारांना दंडव्याज नाही

यावेळी नगराध्यक्षा कोरी म्हणाल्या, कोरोना संसर्गाचे गांभिर्य अद्यापही लोकांना समजलेले नाही. अनेक लोक विविध कारणांनी रस्त्यावर दिसत आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण आढळले आहे. असे असूनही अद्यापही लोक रस्त्यावर विनाकारण फिरत आहेत. गडहिंग्लज शहरामध्ये कोरोनाचा कोणत्याही प्रकारचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी पालिका प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यामध्ये पुढील तीन दिवस गडहिंग्लज शहरामध्ये पालिका कर्फ्यू राबविला जाणार आहे. यामध्ये मेडिकल दुकाने वगळता कोणत्याही प्रकारची दुकाने सुरू ठेवता येणार नाहीत. या शिवाय कोणालाही शहरामध्ये विनाकारण रस्त्यावर येता येणार नाही. दुधासाठी सकाळी ६ ते ८ ही वेळ राहील. याशिवाय रविवारपासून वृत्तपत्रे सुरू होणार असून ती सकाळच्या सत्रात वाटण्याची मुभा दिली आहे. यानंतर शहर संपूर्ण पुन्हा लॉकडाऊन केले जाईल. 

कोल्हापूर : कागल पश्चिम भागात १,८९७ जण होम क्वारंटाईनमध्ये!

तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या कर्मचार्‍यांकडून गडहिंग्लज शहरातील ठिकठिकाणी याबाबत तपासणी केली जाणार असून, अनावश्यक रस्त्यावर येणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. गडहिंग्लज शहराला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी पालिकेने कडक उपाययोजना अवलंबल्या आहेत. सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही कोरी यांनी केले आहे. 

कडक कारवाई करणार

गडहिंग्लज शहरात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी पालिकेच्या पदाधिकार्‍यांनी तीन दिवस गडहिंग्लज शहर पूर्णतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात बाहेरून मोठ्या प्रमाणात लोक येत असून या सर्वांचा परिणाम होऊ नये, याकरिता हा निर्णय घेतला आहे. यामध्ये कुचराई करणार्‍यांवर कडक कारवाई करू, असा इशारा मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांनी दिला आहे.