Sat, Dec 07, 2019 08:57होमपेज › Kolhapur › पोस्टमॉर्टम विभागात होतेय पैशाची मागणी

मृतदेहासाठी 'येथे' द्यावी लागते लाच!

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 23 2017 2:06AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : सचिन टिपकुर्ले 

सीपीआरमध्ये मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यासाठी आलेल्या नातेवाईकांकडूनच हजार ते पाचशे रुपयांची मागणी करण्यासाठी केली जाते. पोस्टमॉर्टम केल्यानंतर मृतदेहाला गुंडाळण्यासाठी जे कापड लागते त्यासाठी पैसे मागत असल्याचे येथील कर्मचारी बिनधास्तपणे सांगतात. मृतदेहाची हेळसांड होऊ नये, यासाठी दु:खा वेग विसरून  नातेवाईक तत्काळ मागेल ती रक्‍कम देतात.   

सीपीआरमध्ये येणार्‍या रुग्णांवर गेल्या काही दिवसांपासून चांगल्या सुविधा देण्यात येत आहेत. कोट्यवधी रुपयांची यंत्रणा यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. रोटरी क्‍लब हेरीटेजनेही शिशू विभाग दत्तक घेऊन त्यामध्ये आधुनिक सुविधा पुरवल्या आहेत. अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करून रुग्णांना येथे  चांगल्या सुविधा दिल्या जातात ही खात्री पटवून देण्यासाठी सीपीआर प्रशासनातील अधिकारी प्रयत्नशिल असतात. पण काही कर्मचारी आपल्या कार्यपध्दतीमुळे या कामाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात. संशयास्पद मृत्यू झालेल्या व्यक्‍तीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करणे कायद्याप्रमाणे बंधनकारक असते.

ग्रामीण रुग्णालयात पोस्टमॉर्टमची सोय असली तरी बहुधा सीपीआरमध्येच पोस्टमॉर्टम केले जाते. पोस्टमॉर्टम करण्यासाठीची सर्व कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सीपीआर कर्मचार्‍यांकडून  मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी ताब्यात घेण्यात येतो. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर संबंधीतांवर  नातेवाईक कोण अशी विचारणा केली जाते. नातेवाईक आल्यानंतर मृतदेह गुंडाळण्यासाठी पांढरे कापड आहे का अशी विचारणा केली जाते नातेवाईक नाही असे उत्तर देताता. कर्मचारी तत्काळ आमच्याकडील कापड वापरतो असे सांगतात. मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवत असताना कापडाचे पैसे मागितले जातात. याची कोणतीही पावती दिली जात नाही. वास्तविक सीपीआर प्रशासन यासाठी कापड पुरवत असताना संबंधित नातेवाईकांकडून पैशाची मागणी येथील कर्मचारी करत असतात.