Sun, May 31, 2020 00:52होमपेज › Kolhapur › कस्तुरी फेसबूक लाईव्हमध्ये आज मिक्स फ्रुटजॅम अँड ज्युस

कस्तुरी फेसबूक लाईव्हमध्ये आज मिक्स फ्रुटजॅम अँड ज्युस

Last Updated: May 23 2020 12:40AM
कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा

जॅम आणि ज्युस याचे छोट्यांना भलतेच वेड असते. आंबट-गोड फळांपासून बनविलेले ‘मिक्स फु्रट जॅम’ आणि ज्युस जेवढे टेस्टी तेवढेच हेल्दीही. या करिता दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब यांच्या वतीने लॉकडाऊन स्पेशलमध्ये मिक्स फ्रुट जॅम अँड ज्युस फेसबूक लाईव्ह रेसिपी शो आयोजित करण्यात आला आहे. आज शनिवारी (दि. 23 ) सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम पाहता येणार आहे. कार्यक्रमात रोहिणी देशमुख या मार्गदर्शन करणार आहेत.

लहान मुले कधी काय खाण्याचा हट्ट करतील आणि कधी काय खाण्यास नकार देतील, हे सांगता येत नाही. आपल्या मुलाने हेल्दी खावे, असे प्रत्येक आईला वाटत असते. मात्र, नेमके पौष्टिक असणार्‍या भाज्या आणि फळे खायला मुले तयार नसतात. या पदार्थांना थोडसे वेगळे स्वरूप देऊन मुलांना खायला देण्यासाठी जॅम आणि ज्युसची मदत होते. 

फळे खाण्यास तयार नसलेली मुले मिक्स फ्रुट जॅम आणि ज्युस आवडीने खातात. आता बाजारातून हे पदार्थ खरेदी करण्यापेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घरीच बनवता येणार आहेत. यामुळे फ—ेश जॅम आणि ज्युस मुलांच्या पोटात जाणार असून मुले आणि आईही खूश होणार हे नक्‍की.

चला तर मग फेसबूकवर PudhariKasturi connectkolhapur सर्च करा आणि लाईक करा किंवा https://www.facebook.com/ groups/ 650188125423230 /?ref=share वर लॉगइन करा. अधिक माहितीसाठी संपर्क 9665155430, 8483926989, 9096853977.