पाच वर्षांच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या

Last Updated: Nov 09 2019 1:43AM
Responsive image


जुन्नर ः वार्ताहर

नारायणगाव येथील 30 वर्षीय विवाहितेने आपल्या 5 वर्षांच्या मुलासह कुसुर येथील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

प्राजक्ता स्वप्निल वाजगे (रा. नारायणगाव, ता. जुन्नर) ही विवाहिता आपल्या 5 वर्षीय चिमुकला आरुष याला घेऊन कुसुर  येथे मामाकडे येण्यासाठी निघाली  होती. परंतु ती मामाच्या घरी न पोहोचल्याने त्यांची शोधाशोध करण्यास सुरुवात केली असता कुसुर येथील मीना महाबरे यांच्या शेतातील विहिरीच्या कठड्यापाशी त्यांची चप्पल दिसून आली. त्यामुळे या विहिरीच्या पाण्यात शोधाशोध केली असता, पाण्यामध्ये प्राजक्ता व आरुष यांचे  मृतदेह तरंगताना आढळून आले. अनिल वळसे यांनी या घटनेची माहिती जुन्नर पोलिसांना दिली असून, या घटनेचा तपास हवालदार नीलेश कोळसे करीत आहेत.