Tue, Jun 15, 2021 11:56
कस्तुरी क्लबतर्फे मँगो रेसिपी कार्यशाळा

Last Updated: May 12 2021 1:15AM

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा

सध्याचा सीझन आहे आंब्याचा. कोणत्याही निमित्ताची वाट न पाहता खवय्ये आंब्याचा मनसोक्त आस्वाद घेतात. मग तो कुठल्याही प्रकारे असो. अशाच आंबाप्रेमी महिलांसाठी दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लब यांच्या वतीने समर स्पेशल मँगो रेसिपीज कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. 15) दुपारी 1 वाजता झूम अ‍ॅपवरून ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे.

कार्यशाळेत मँगो एगलेस केक, मँगो कुल्फी प्रिमिक्स, मँगो बिस्किटस्, हेल्दी मँगो छिया पुडिंग, मँगो मस्तानी, मँगो वडी अशा नावीन्यपूर्ण रेसिपी शिकण्याची संधी लॉकडाऊनच्या काळातही कस्तुरी क्लबने महिलांसाठी यानिमित्ताने उपलब्ध करून दिली आहे. कार्यशाळेत सहभागी प्रत्येक महिलेला पदार्थांची रेसिपी शेअर केली जाणार आहे. ही कार्यशाळा एकच दिवस असणार 

आहे. कार्यशाळेत सहभागासाठी 200 रुपयांचे माफक शुल्क आकारले जाणार असून शुल्क गुगल पे किंवा फोन पे द्वारे 8483926989 किंवा 9096853977 या मोबाईल नंबरवर भरावे.