यशवंतरावांनी महाराष्ट्राचा ठसा  दिल्लीत उमटवला : शरद पवार

Last Updated: Jan 23 2021 1:26AM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र ही नेतृत्वाची खाण आहे. या खाणीतून हिरे तयार करण्याचे काम करण्याबरोबरच स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा ठसा दिल्लीत उमटविला, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी काढले. जिल्हा परिषदेच्या आवारात बसविलेल्या स्व. चव्हाण यांच्या पुतळ्यामुळे येथील लोकप्रतिनिधी, अधिकार्‍यांना योग्य काम करण्याची प्रेरणा मिळेल, असेही ते म्हणाले. पवार यांनी स्व. चव्हाण यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांचा जीवनपट उलगडून दाखविला.

स्व. चव्हाण यांच्या नऊ फुटी पुतळ्याचे  अनावरण, रुग्णवाहिका लोकार्पण, सानुग्रह अनुदान वाटप, राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार वितरण, जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्याच्या बांधकामाचा शुभारंभ असा संयुक्त कार्यक्रम पोलिस मैदानावर झाला. याप्रसंगी पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ होते.

पवार म्हणाले, सामान्य कुटुंबांत जन्मलेले चव्हाण यांचे विचार नेहमीच तरुणांना प्रेरणा देणारे आहेत. कसलीही परिस्थिती असो त्यावर मात करण्यास ते नेहमीच तयार असत. सत्ता केंद्रित झाली की ती भ—ष्ट होते, असे ते म्हणायचे. त्यामुळे सत्तेचे विकेंद्रिकरण करण्यासाठी त्यांनी पंचायत राज व्यवस्था निर्माण केली. हे करताना अयोग्य कामाला कधी होकार देऊ नका आणि सामान्य लोकांच्या योग्य कामाला कधी उशिर करू नका, ही शिकवण त्यांनी दिली.

महाराष्ट्र आघाडीवर राहण्यात यशवंतराव चव्हाण यांचा खूप मोठा वाटा आहे. औद्योगिकरणासाठी त्यांनी एमआयडीसींची स्थापना केली. त्यांना अर्थपुरवठा करण्यासाठी वित्तीय कंपन्या स्थापन केल्या. त्यामुळेच महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला. यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षण मंत्रिपदाची शपथ घेतली आणि चीनने युद्ध मागे घेतले, यावरून त्यांचे कणखर व्यक्तिमत्व दिसून येते, असेही ते म्हणाले.

यशवंतरावांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकार दिले : चव्हाण

अधिकाराचे केंद्रीकरण न करता त्याचे विकेंद्रीकरण करावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वतंत्र अधिकार देण्याची संकल्पना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी मांडली. त्यामुळेच आज ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदा आपल्या पायावर भक्कमपणे उभ्या आहेत, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.राज्यात महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठी तयार नव्हते. परंतु शरद पवार यांनी महाविकास आघाडी काँग्रेससह अस्तित्वात आणली, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

सर्वसामान्यांसाठी काम करण्याची गरज : ग्रामविकास मंत्री मुश्रीफ

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सामान्य जनतेला आपल्या निर्णयाचा लाभ कसा होईल याचा विचार करून काम केले पाहिजे.  सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करण्याच्या निर्णयाने सामान्यांना सरपंचपद भूषविता येणार आहे. छत्रपती शिवराय यांचा शिवराज्याभिषेक दिन हा संपूर्ण महाराष्ट्रात गुढ्या उभा करून साजरा होणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांना रूग्णवाहिका दिल्यामुळे ग्रामीण रुग्णांना त्याचा मोठा लाभ मिळेल. जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले, राज्य जनतेचे असावे अशी भूमिका यशवंतराव चव्हाण यांची होती. महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर ग्राविकासाला बळकटी देणारे निर्णय चव्हाण यांनी घेतले.

स्व. चव्हाण यांच्यामुळे औद्योगिक, शेती क्षेत्राचा विस्तार : पालकमंत्री

पालकमंत्री सतेज पाटील यांनी महाराष्ट्र शेती, सहकार औद्योगिक क्षेत्राचा विस्तार करण्यात यशवंतराव चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. पंचायत राज व्यवस्थेतून सामान्य 

महिला दिनी अमृता फडणवीसांचं नवंकोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला! (video)


जळगाव : पुल व रस्त्याच्या कामासाठी शिवाजीनगरात नागरिकांचा रास्ता रोको आंदोलन


२०२९ मध्ये पृथ्वीला मोठा धोका! प्रचंड मोठा 'अपोफिस' लघुग्रह जाणार पृथ्वीजवळून; 'नासा'ने केलं स्पष्ट


देवदत्त पडिक्कल टीम इंडियाच्या दरवाजावर मारतोय धडका!


‘स्वाभिमानी’च्या राजू शेट्टींचे जयंत पाटलांच्या राजारामबापू साखर कारखान्या समोर आत्मक्लेश आंदोलन


'या' अभिनेत्याचं पाचव्यांदा लग्न!, आधीच्या चारीही पत्नी लग्नात हजर, नवी पत्नी ३१ वर्षांनी लहान


'चोराच्या उलट्या बोंबा', फडणवीसांच्या टीकेला जयंत पाटलांचे उत्तर


राज्य अर्थसंकल्प ः ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प पूर्णपणे फसवा; विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका


कोल्हापूर : मणकर्णिका कुंड उत्खननात आजअखेर सापडल्या ४५७ वस्तू, मेड इन जर्मनीची रिव्हॉल्व्हर; काडतूसे, प्राचीन मूर्त्या


महाराष्ट्र अर्थसंकल्प : लॉकडाऊनमध्ये शेतीनेच राज्याला सावरले : अर्थमंत्री अजित पवार