Sat, Jul 11, 2020 12:16होमपेज › Kolhapur › कागलची जागा शिवसेनेकडेच राहणार : खासदार संजय मंडलिक 

कागलची जागा शिवसेनेकडेच राहणार : मंडलिक 

Published On: Sep 17 2019 6:03PM | Last Updated: Sep 17 2019 8:29PM

खासदार संजय मंडलिक कागल : प्रतिनिधी 

कागलची जागा शिवसेनेची असून ती शिवसेनेकडेच राहणार आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे खासदार म्हणून माझ्या मताचा आदर करतील. त्यामुळे अन्य चर्चा निरर्थक आहेत, असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले. येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आबिटकर होते. 

यावेळी खा. मंडलिक म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार संजय घाटगे यांचा फक्त पाच  हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेचाच हक्क आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निश्चितपणे या जागेचा विचार करतील. कागलची जागा शिवसेनेकडे घेण्यासाठी  मी  प्रयत्नशील राहणार आहे. असे झाल्यास माझ्या मताचा आदर होईल. दोन चार दिवसात याचा निर्णय होईल. 

अधिक वाचा : समरजित घाटगेच कागलमधून युतीचे उमेदवार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यावेळी माजी आमदार संजय घाटगे म्हणाले की, समोर कोण याची चिंता नाही, अंतिम विजयापर्यंत मी लढतच राहणार आहे. अनेकदा हरलो असलो तरी माझ्या वाट्याला जे जनतेचे प्रेम आले ते अफाट आहे. माझ्या पराभवानंतर अनेक लोकांनी चुली देखील पेटवल्या नव्हत्या. सदाशिवराव मंडलिक यांचा आदर्श घेऊन आम्ही कार्यरत आहोत. यावेळी आ. आबिटकर, अमरीश घाटगे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, अरुण इंगवले, उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, मुरगूडचे उपनगराध्यक्ष धनाजीराव गोधडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.