Sun, Jul 05, 2020 15:25होमपेज › Kolhapur › राजू शेट्टींचे शक्तीप्रदर्शन; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले बैलगाडीतून (video)

राजू शेट्टींचे शक्तीप्रदर्शन; उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले बैलगाडीतून (video)

Published On: Mar 28 2019 1:40PM | Last Updated: Mar 28 2019 1:54PM
कोल्‍हापूर : पुढारी  ऑनलाईन 

हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी गुरुवारी (ता. २८) उमेदवारी अर्ज दाखल करण्‍यासाठी बैलगाडीतून आले. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्‍यांच्‍यासोबत राष्‍ट्रवादीचे जयंत पाटील हे देखील बैलगाडीतून आले. यावेळी शेट्टी यांच्या बरोबर अर्ज भरण्यासाठी आमदार सतेज पाटील, हसन मुश्रीफ आले होते.

शेट्टी यांच्या बैलगाडीतील मिरवणुकीला शेतकरी संघटनेच्‍या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी होती. स्‍वाभिमानी पक्षाचे झेंडे हातत घेऊन कार्यकर्ते यामध्‍ये मोठ्‍या संख्‍येने सहभागी झाले आहेत. 

व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे मिरवणूक कोल्‍हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नेण्यात आली.