Fri, Sep 25, 2020 17:02होमपेज › Kolhapur › लिंगनूरजवळ पावणेचार लाखांची लूट

लिंगनूरजवळ पावणेचार लाखांची लूट

Published On: Dec 23 2017 2:05AM | Last Updated: Dec 23 2017 1:04AM

बुकमार्क करा

नेसरी : वार्ताहर

दूध संस्थेचे बिल घेऊन मोटारसायकलवरून दोघे सचिव जात असताना त्यांना धक्‍का देऊन, तिखट डोळ्यात टाकून आणि कोयत्याने हल्ला करून 3 लाख 70 हजार रुपये लूटण्यात आले.  लिंगनूर मुंगूरवाडी रस्त्यावर दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.

बुगडीकट्टी (ता.गडहिंग्लज) येथील महालक्ष्मी दूध संस्थेचे सचिव चाळू महादेव राजगोळे व हनुमान दूध संस्थेचे सचिव दत्तू  पाटील  दूध बिल नेण्यासाठी हेब्बाळ जलद्याळ येथील बँक ऑफ इंडियामध्ये आले होते. दुपारी एकच्या सुमारास  दोघेही  लिंगनूर ते मूंगूरवाडी मार्गावरून जात असताना त्यांच्या मोटारसायकलला धक्‍का दिला. 

यामध्ये  दोघेही रस्त्यावर पडले. चाळू यांच्या  हातातील पैशाची बॅग हिसकावून पोबारा केला. प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच एकावर कोयत्याने हल्ला केल्याने दत्तू पाटील जखमी झाले.