Tue, Jul 07, 2020 04:49होमपेज › Kolhapur › पन्हाळा : गाडीला धडकून जखमी झालेल्या रान मांजराला जीवदान  (video)

पन्हाळा : गाडीला धडकून जखमी झालेल्या रान मांजराला जीवदान (video)

Last Updated: Jun 07 2020 11:02AM

वाहनास धडकेत जखमी झालेले रान मांजरपन्हाळा : पुढारी वृत्त सेवा  

दोनच दिवसांपूर्णी जागतीक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. तर काल शिवराज्यभिषेक दिन या दोन्ही दिवशी भूतलावरील सर्व सजीवांची काळजी घ्या संदेश देण्यात येतो पण पन्हाळागडावरील बुधवरपेठ येथे एका नर रानमांजराला तडपडत पडावे लागले. याची माहिती मिळताच पन्हाळ्यातील सर्प व प्राणीमित्र डॉ.धीरज कुराडे यांनी त्याच्यावर योग्य उपचार करत त्याला पुन्हा जंगलात सोडून देत जीवदान दिले आहे.

वडनेरेंचा सल्‍ला नागरी वस्त्यांसाठी धोकादायक!

आज सकाळी येथील बुधवार पेठेत एक पूर्ण वाढ झालेले रानमांजर जंगलात जात असताना अचानक आलेल्या वाहनास धडकले व जखमी झाले. योगेश सुतार यांच्या घरासमोरील रस्त्यावर ही घटना घडली. त्यानंतर ते बिथरून एका पत्र्याच्या शेड मध्ये घुसून बसले होते. याची माहिती योगेश सुतार यांनी तातडीने वन विभाग व प्राणी मित्र डॉ.धीरज कुराडे यांना कळवली. माहिती मिळताच डॉ. धीरज यांनी वन विभागाचे कर्मचारी शौकत शेख, व रंगराव उदाळे यांना बरोबर घेऊन त्या जखमी रानमांजराला अत्यंत सावधपणे पकडले. रानमांजर वाहनास धडकल्याने त्याचा डावा पाय मोडल्याचे डॉ. धीरज यांना लक्षात आले. त्यानंतर त्यांनी वन विभागाचे वनपाल विजय दाते व आपल्या प्राणी मित्रांचा सल्ला घेतला व या जखमी रान मांजरास सोनतळी येथील वाइल्ड लाईफ रेस्क्यू सेंटर मध्ये नेऊन सोडले. डॉ. धीरज कुराडे यांच्या तत्परतेने रान मांजरास जीवदान मिळाले. डॉ. धीरज हे सर्प मित्र असून आता पर्यंत हजारो साप पकडून त्यांनी नैसर्गिक वास्तव्यात सोडले आहेत. आज एका जंगली नर रान मांजरास कुराडे यांनी जीवदान दिल्या बद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.