Mon, Feb 17, 2020 18:32होमपेज › Kolhapur › कृष्णा खोरेच्या उपाध्यक्षपदावरून खा. संजय पाटील यांना वगळले

कृष्णा खोरेच्या उपाध्यक्षपदावरून खा. संजय पाटील यांना वगळले

Last Updated: Jan 17 2020 9:59PM

खा. संजय पाटीलकोल्हापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदावरून भाजपचे खासदार संजय पाटील (सांगली) यांना बदलण्यात आले आहे. त्याचबरोबर गोदावरी, मराठवाडा व तापी खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षांनाही बदलण्यात आले आहे.

राज्यातील सत्ता बदलानंतर विविध महामंडळांवर असलेल्या भाजपच्या पदाधिकार्‍यांना हटविण्यात येत आहे. यामध्ये आता पाटबंधारे विकास महामंडळांचा क्रमांक लागला आहे.

भाजप सरकारने सांगलीचे भाजप खासदार संजय पाटील यांची महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी केलेली नियुक्‍त सरकारने रद्द केली आहे. त्याचबरोबर गोदावरी, मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष भास्कर आंबेकर, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नागनाथ निडवदे तसेच तापी खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष चिमणराव पाटील यांनाही पदमुक्‍त करण्याचा आदेश सरकारने काढला आहे. भाजपने केलेल्या या निुयक्त्या रद्द करून सरकारने आता आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याचा मार्ग मोकळा केला आहे.