Thu, Dec 03, 2020 06:52होमपेज › Kolhapur › कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा आजपासून

कोल्हापूर ते मुंबई विमानसेवा आजपासून

Last Updated: Oct 27 2020 1:25AM

संग्रहीत फाेटाेउजळाईवाडी : पुढारी वृत्तसेवा

ट्रू जेटची कोल्हापूर-मुंबई विमानसेवा मंगळवारपासून (दि. 27) सुरू होत आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार अशी आठवड्यातून तीन दिवस ही सेवा असेल, असे विमानतळ संचालक कमलकुमार कटारिया व ट्रू जेट कंपनीचे व्यवस्थापक रणजितकुमार यांनी सांगितले.

लॉकडाऊनमध्ये बंद झालेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा तब्बल  सात महिन्यांनंतर सुरू होत आहे. ही सेवा लवकर चालू करण्यात यावी, अशी मागणी उद्योजक, व्यापारी तसेच विविध औद्योगिक संघटनांकडून होत होती. दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी विमानतळ प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क साधून कोल्हापूर मुंबई-विमानसेवा सातही दिवस सुरू राहावी, अशी मागणी केली आहे. 

लवकरच ही विमानसेवा आठवड्यातून सातही दिवस सुरू करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.