Thu, Sep 24, 2020 16:14होमपेज › Kolhapur › नगरसेवकपुत्र आणि अधिकार्‍यांत वादावादी

नगरसेवकपुत्र आणि अधिकार्‍यांत वादावादी

Published On: Dec 31 2017 1:51AM | Last Updated: Dec 31 2017 1:28AM

बुकमार्क करा
कोल्हापूर ः प्रतिनिधी 

महापालिकेचे मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील आणि नगरसेविका दीपा मगदूम यांचा मुलगा शांकी मगदूम यांच्यात शनिवारी दुपारी फोनवरून वादावादी झाली. एकमेकांना शिवीगाळबरोबरच बघून घेण्याची भाषा वापरण्यात आली. त्यानंतर मगदूम ये तुला दाखवतोच, असे म्हणून महापालिकेतील पाटील यांच्या कार्यालयात गेले; परंतु तेथे पाटील नसल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, मगदूम यांनी पाटील यांच्या केबिनच्या दरवाजावर लाथा मारल्याची चर्चा सुरू होती. 

देवकर पाणंद परिसरात कचरा साठल्याची तक्रार मगदूम यांनी पाटील यांच्याकडे केली होती. पाटील यांनी आरोग्य निरीक्षकांना त्याविषयी सूचना दिल्या होत्या; परंतु त्यानंतरही कचरा उठाव झाला नसल्याने मगदूम यांनी पुन्हा पाटील यांना फोन केला. त्यावरून दोघांत वादावादी झाली. अखेर काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख यांनी मगदूम व पाटील यांची समजूत काढली.