Sun, Mar 29, 2020 08:15होमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या महापौरांचे कोरोनाशी लढण्यासाठी सहकार्याचे आवाहन (video)

कोल्हापूरच्या महापौरांचे कोरोनाशी लढण्यासाठी सहकार्याचे आवाहन (video)

Last Updated: Mar 24 2020 12:43PM

कोल्हापूर महापौर, निलोफर आजरेकरकोल्हापूर - पुढारी वृत्तसेवा

राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. त्यामुळे अनावष्यक गर्दी करू नये असे आवाहन कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर यांनी केले आहे. महापौर आजरेकर यांनी चक्क माईक हातात घेऊन हा संदेश कोल्हापूरकरांना दिला. कोरोनामुळे राज्यात संचारबंदी लागू आहे. आरोग्य यंत्रणा राबत आहेत. तसेच पोलिस प्रशासनही संचारबंदीची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करत आहे. त्यांना सहकार्य करण्याचे आवाहनही महापौरांनी कोल्हापूरच्या जनतेला केले.

बाजारात वृद्ध लहान मुलांनी येऊ नये. अत्यावश्य गरज असेल तरच बाहेर पडा. रस्त्यावर गर्दी करू नका. याप्रकारचे आवाहन करत असल्याची माहिती महापौरांनी पुढारीशी बोलताना केली. पुढारीच्या माध्यमातूनही जनतेला कायद्याचे उल्लंघन करु नका. सर्वांनी शक्यतो घरीच राहा असे आवाहन महापौर निलोफर आजरेकर यांनी केले. सर्वांना आपापल्या जीवाची काळजी घ्या. बाजारात अनावष्यक गर्दी करू नका. भाजी विक्रेत्यांनी मास्क, रुमालाचा वापर करा, कुटुंबाचे रक्षण करा. सर्वांनी घरातच राहून प्रशआसनाला मदत करावी अशी कळकळीची विनंती शहरच्या प्रथम नागरिक या नात्याने करत असल्याचे महापोरांनी सांगितले.