Thu, Sep 24, 2020 16:46होमपेज › Kolhapur › कसबा बावड्यातील प्रेमीयुगुलाचे विषप्राशन

कसबा बावड्यातील प्रेमीयुगुलाचे विषप्राशन

Published On: Dec 31 2017 1:51AM | Last Updated: Dec 31 2017 1:42AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

प्रेमाला होणार्‍या विरोधाला कंटाळून कसबा बावड्यातील प्रेमीयुगुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शनिवारी रात्री रमणमळ्यात ही घटना घडली. दोघांना परिसरातील नागरिकांनी तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. याची नोंद शाहूपुरी पोलिसांत झाली. कसबा बावड्यातील आडवी गल्ली येथे राहणार्‍या एका 22 वर्षीय तरुणाचे परिसरातील एका मुलीशी प्रेमसंबंध आहेत. मात्र, दोघांच्या प्रेमाला घरातून विरोध होता. गेले काही दिवस याच कारणावरून दोघेही नेहमी तणावात होते. शनिवारी याला कंटाळून दोघांनी रमणमळा

 परिसरात जावून विषारी औषध सेवन केले. दोघांना उलट्यांचा त्रास जाणवू लागल्याने दोघे काही अंतर चालत पोवार पाणंदनजीक आले. येथील नागरीकांना याची माहिती मिळताच त्यांनी खासगी वाहनातून दोघांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. तरुणाची प्रकृती स्थिर असून तरुणीची प्रकृती चिंताजनक बनली आहे. घटनेची माहिती मिळताच कसबा बावड्यातील तरुणांनी सीपीआरच्या आवारात गर्दी केली होती. शाहूपुरी पोलिसांनी रात्री दोघांच्या नातेवाईकांचे जाबजबाब नोंदवून घेतले.