Fri, Sep 18, 2020 12:57होमपेज › Kolhapur › कोल्हापूर: वैरण आणण्यासाठी गेलल्या शेतकऱ्याचा पुरात बुडून मृत्यू  

कोल्हापूर: वैरण आणण्यासाठी गेलल्या शेतकऱ्याचा पुरात बुडून मृत्यू  

Last Updated: Aug 11 2020 8:14PM
पन्हाळा (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे गावातील शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. वसंत रघुनाथ पाटील वय (६०) राहणार असे त्या वृद्धाचे नाव आहे. दरम्यान वसंत हे वैरण काल (दि.१०)आणण्यासाठी होते ते घरी परत आले नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली. ते आज (दि.११) सकाळी  विकास आनंदा पाटील यांच्या शेतालगत कासारी नदीच्या पात्र आहे त्याठीकाणी मृतावस्थेत आढळले. 

या घटनेची नोंद पन्हाळा पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे सदर मृतदेह शवविच्छेदन करून  नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तरी या घटनेचा अधिक तपास पोलिस हवलदार ए.एन.यादव करीत आहेत. दरम्यान पन्हाळा तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीकडे या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुराच्या पाण्यात बुडुन शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

 "