Sat, Feb 29, 2020 19:15होमपेज › Kolhapur › अंबाबाईच्या सुवर्ण अलंकारांना झळाळी (Video)

अंबाबाईच्या सुवर्ण अलंकारांना झळाळी (Video)

Published On: Oct 06 2018 5:03PM | Last Updated: Oct 06 2018 5:38PMकोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन 

साडेतीन शक्‍तीपीठापैकी एक असलेल्‍या कोल्‍हापुरच्या श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्‍सवाची सध्या जय्‍यत तयारी सुरू आहे. काल शुक्रवारी देवीच्या नित्‍य पूजेतील चांदीचे अलंकार, वस्‍तू आणि पूजेच्या साहित्‍याची स्‍वच्छता करण्यात आली होती. आज शनिवारी देवीच्या नित्‍य पूजेतील सोन्याच्या दागिन्यांची स्‍वच्छता करून पॉलिश करण्यात आले. यामुळे या पारंपारिक दागिन्यांना पुन्हा झळाळी प्राप्त झाली.

नवरात्रोत्‍सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिरात गेल्‍या आठ दिवसांपासून मंदिराची स्‍वच्छता, शिखरांची रंगरंगोटी करण्यात येत आहे. गेल्‍या दोन दिवसांपासून देवीच्या नित्‍य पूजेतील चांदी सोन्याच्या दागिन्यांची स्‍वच्छता करून त्‍यांचे पॉलिश करण्याचे काम सुरू आहे. आज मंदिराच्या गरुड मंडपात देवीच्या सुवर्ण अलंकारांची स्‍वच्छता करण्यात आली. 

देवीच्या मौल्‍यवान दागिन्यांची देखभाल करणारे महेश खांडेकर...

देवीच्या दागिन्यांमध्ये अनेक मौल्‍यवान आणि किेमती दागिन्यांची समावेश आहे. आज यातील काही मोजके वापरात असलेल्‍या दागिन्यांची स्‍वच्छता करून त्‍यांना पॉलिश करण्यात आले. देवीच्या दागिन्यांचा हा मौल्‍यवान खजिण्याचे हवालदार म्‍हणून महेश खांडेवर हे काम पाहतात. नित्‍य पूजेनुसार श्रीपुजकांना सकाळी देवीची पूजा बांधताना दागीने देणे. ते दागिने पुन्हा रात्री मोजुन घेणे ते पुन्हा खजिण्यात व्यवस्‍थीत ठेवणे ही कामे खांडेकर यांच्याकडून नित्‍य नेमाने सेवा म्‍हणून केली जाते. 

 त्‍यांची ही ११ वी पीढी सध्या देवीच्या दागिन्यांची देखभाल करण्याचे काम पाहते. महेश खांडेकर यांनी दिलेल्‍या माहितीनुसार स्‍वच्छ करण्यात आलेल्‍या दागिन्यांमध्ये निंत्‍यालंकारात ठुशी, बोरमाळ, मोहरा, १६ पदरी चंद्रहार, म्‍हाळुंग, कर्णकुंडले, मोर, नथ तर उत्‍सवमुर्तीच्या दागिन्यांमध्ये  ठुशी, बोरमाळ, चाफेकळी माळ, छत्री, किरीट, कुंडल, जडावाचे दागिने, कुंड, पेंड, सातपदरी कंठी, चार पदरी कंठी, मंगळसूत्र, चंद्रकोर लॉकेट, कोल्‍हापुरी साज, बोरमाळ, मोहनमाळ, गदा, चोपदार दंड, प्रभावळ, श्रीयंत्र हार, पुतळ्‍याची माळ, सोळा पदरी चंद्रहार, तणमणी जडवा, देवीची सुवर्ण पालखी अादी दागिन्यांची स्‍वच्छता करण्यात आली. यामध्ये गेली ३० वर्षे सेवा देणारे धोंडीराम विश्वनाथ कवठेकर यांनी देवीच्या दागिन्यांची स्‍वच्छता केली. त्‍यांच्यासोबत मदतीला १० कारागीरांनीही दागिन्यांच्या स्‍वच्छतेच्या कामी मदत केली. 

नवरात्रोत्‍सवाची देवस्‍थानकडून जय्‍यत तयारी : महेश जाधव

यावेळी पश्चीम महाराष्‍ट्र देवस्‍थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी देवीचे विविध दागीणे,त्‍यांचे महत्‍व नवरात्रोत्‍सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्‍थानकडून केलेली जय्‍यत तयारी आणि भाविकांसाठीच्या सुविधा, महिलांची सुरक्षीतता आणि इतर व्यवस्‍थेविषयीची पुढारी ऑनलाईनला माहिती दिली.