कोल्‍हापूर : धैर्यप्रसाद रोडवर भीषण अपघातात दुचाकीला भरधाव कारची धडक; एक ठार

Last Updated: Jul 11 2020 4:20PM
Responsive image


कोल्‍हापूर : पुढारी वृत्‍तसेवा

कोल्‍हापुरातील धैर्य प्रसाद हॉल ते सदर बाजार कॉर्नर या मार्गावर एका दुचाकीला भरधाव कारने उडवले. ही घटना आज सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघाताचे चित्रण एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले असून, या अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

याबाबतची नोंद करण्याचे काम शाहूपुरी पोलिस ठाण्यात सुरू आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सकाळी सातच्या सुमारास पुरुषोत्तम बालिगा हे नातेवाईकांसह भविष्य निर्वाह निधी कार्यालय मार्गे उलट दिशेने सदर बाजारच्या दिशेने जात होते. त्यावेळी नैतिक राहुल करणावर हे ताराराणी चौकातून ताराबाई पार्क च्या दिशेने जात होते. सदर बाजार चौकाच्या दिशेने बालिगा यांच्या मोटर सायकलची व कर्नावट यांच्या मोटाराची जोराची धडक झाली.

मोटरसायकलस्वार हवेत उडून खाली पडले, तर मोटार रस्ता दुभाजकावरून पलटी झाली. यामध्ये दुचाकीवरील बालिंगा हे जागीच ठार झाले, तर त्यांच्या मागे बसलेला नातेवाईक व मोठा चालक कर्नावट हे दोघे गंभीर जखमी झाले