Thu, Aug 13, 2020 17:29होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : जिल्ह्यात एनडीआरएफची दोन पथके दाखल

कोल्‍हापूर : जिल्ह्यात एनडीआरएफची दोन पथके दाखल

Last Updated: Jul 15 2020 5:51PM
कोल्‍हापूर : पुढारी वृत्‍तसेवा

गेल्यावर्षी जिल्ह्यात आलेल्या भीषण महापुराच्या पार्श्वभूमीवर, यावर्षी जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या पथकांना तैनात केले आहे. निरीक्षक नितेश कुमार यांच्या नेतृत्वाखालील प्रत्येकी 22 जवानांचा  समावेश असलेली दोन पथके बुधवारी जिल्ह्यात दाखल झाली. 

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक साधनसामुग्रीसह काळजी घेत, प्रसंगी पीपीई किट घालून बचाव कार्य केले जाईल असे कुमार यांनी सांगितले. पथकाकडे प्रत्येकी तीन बोटी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग रोप मशीन आदी साधनसामुग्री उपलब्ध आहे. दिनांक 15 जुलै ते 15 ऑगस्ट असे महिनाभर एक पथक कोल्हापूर येथे तर दुसरे पथक शिरोळ येथे कार्यरत राहणार आहे.