Thu, Apr 02, 2020 22:05होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : कोरोनामुळे ग्रामीण भागात 'सोशल डिस्टन्सिंग

कोल्‍हापूर : ग्रामीण भागात 'सोशल डिस्टन्सिंग

Last Updated: Mar 26 2020 4:08PM
भडगाव (ता.कागल) : एकनाथ पाटील 

कोरोना या महाभयंकर व्हायरसचा जग सामना करत असून, संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने शहराबरोबरच ग्रामीण भागात देखील गावच्या वेशी बंद करण्यात आल्‍या आहेत. गावा गावात कमिट्या स्थापन केल्या आहेत. गजबजणाऱ्या गावांमध्ये स्मशान शांतता पसरली आहे, तर अत्यावश्यक सेवेसाठी ग्रामीण भागात देखील पोलिसांनी केलेल्‍या सोशल डिस्टन्सिंग आवाहनला ग्रामस्थांमधून प्रतिसाद मिळत आहे. आम्ही गावात येत नाही... तुम्ही पण येऊ नका...असे म्हणत गावकऱ्यांनी कोरोना हटाव, आरोग्य बचावचा नारा देत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

देशात संचारबंदी असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले असले, तरी ग्रामीण भागात मागील दोन दिवसापूर्वी सर्व व्यवहार सुरू होते. पोलिस प्रशासनाने ग्रामीण भागातील सर्व रस्ते बंद केले आहेत, तर गावा गावातील सर्व व्यवहार ठप्प झाले असून, दवाखाने, किराणा माल दुकान व औषध व दूध संकलनाला परवानगी देण्यात आली आहे. 

तसेच दुकाना समोर पांढर्‍या रंगाचे चौकोण तयार केले आहेत. त्या चौकोणामध्ये उभे राहूनचं क्रमानुसार वस्तू खरेदी केली जात आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक तलाठी सरपंच व कमिटी यांचे सतत लोकांना जागृत राहण्याचे आवाहन करत आहेत. तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असून, अशांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरवात केली आहे. परिणामी गल्लीबोळत शांतता पहावयास मिळत आहे. दरम्‍यान ग्रामीण भागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा तुडवडा जाणवत आहे.