कोल्हापूर : प्रतिनिधी
महापालिकेच्या परवाना विभाग कार्यालयातून सन 1990 ते 2015 कालावधीतील महत्त्वपूर्ण कागदपत्रे चोरीस गेल्याचे उघड झाले. परवाना विभागातील चोरीची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. याचा तपास लक्ष्मीपुरी पोलिस करीत असून इमारतीमध्ये सुरक्षारक्षकांचा अभाव, मोडकळीस आलेले दरवाजे अशा अनेक त्रुटी समोर येत आहेत.
येथील मध्यवर्ती शिवाजी मार्केटमध्ये परवाना विभागाचे कार्यालय आहे. शुक्रवारी मनपा वर्धापनदिनाची सुट्टी जाहीर करण्यात आल्याने दिवसभर कार्यालय बंद होते. कार्यालयातील कर्मचारी शनिवारी सकाळी आले असता येथील फाईल्स गायब असल्याचे दिसून आले होते. कार्यालयाला लागून असलेल्या खोलीचे कुलूप तोडल्याचे तसेच फाईल्सचे गठ्ठे व रजिस्टर पळवून नेल्याचे स्पष्ट झाले. सुरक्षारक्षक नसून दरवाजेही चोरून नेण्यात आले आहेत. सुरक्षेअभावी हा विभाग ‘आवो जावो खर तुम्हारा‘ असा बनला होता.
चोरीस गेलेल्या फाईल्स...
स सन 1990 ते 2011 कालावधीतील अन्न व औषध प्रशासन व्यवसायासंबंधित फेरफार प्रस्ताव, सिलबंद प्रस्ताव, डिमांड रजिस्टर, मनपा प्रस्ताव. स सन 1990 ते 2015 या कालावधीतीत जनरल व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणार्या परवान्यांची कागदपत्रे, हस्तांतर प्रस्ताव, जमेचे रजिस्टर, मनपा ठराव, मनपा प्रस्ताव अशी कागदपत्रे चोरीस गेल्याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसांत करण्यात आली.