Thu, Nov 26, 2020 20:19होमपेज › Kolhapur › श्री अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रूपात पूजा 

करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची महिषासूरमर्दिनी रूपात पूजा 

Last Updated: Oct 24 2020 8:17PM
कोल्‍हापूर : पुढारी ऑनलाईन

शारदीय नवरात्रौत्‍सवाच्या अष्‍टमीच्या  दिवशी आज (शनिवार) करवीरनिवासिनी  श्री अंबाबाईची महिषासूरमर्दिनी स्‍वरूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. देवीने उग्र स्‍वरूप धारण केले असून, ती महिषासुराचा वध करत असल्‍याचे या पजेनतून दाखवण्यात आले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी अंबाबाई मंदिराचे दरवाजे बंद आहेत. मात्र मोजक्‍या लोकांच्या उपस्‍थितीत नवरात्रीत देवीच्या सर्व पूजाअर्चा नियमित सुरू आहेत. दरम्‍यान आज अष्‍टमीच्या दिवशी देवी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्‍यान नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडणार आहे. फुलांनी सजवलेल्‍या ट्रक्‍टरवर देवीचे वाहन असणार आहे. महाव्दार रोड, गुजरी, भाउसिंगची रोड, भवानी मंडप, गुरू महाराज वाडा, बिनखांबी गणेश मंदिर मार्गे पुन्हा मंदिर असा हा मार्ग असणार आहे.