Tue, May 26, 2020 16:07होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : २ ते ४ एप्रिलपर्यंत वडणगे राहणार १०० टक्‍के बंद (video)

कोल्‍हापूर : २ ते ४ एप्रिलपर्यंत वडणगे राहणार १०० टक्‍के बंद (video)

Last Updated: Apr 01 2020 9:35PM
वडणगे (जि.कोल्हापूर) : पुढारी वृत्‍तसेवा 

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. महाराष्‍ट्रातील अनेक शहरांसह गावातही लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील वडणगे ग्रामपंचायतीने २ ते ४ एप्रिलपर्यंत वडणगे गाव १०० टक्‍के बंद ठेवण्याचे घोषित केले आहे. 

यामध्ये दवाखने, औषध दुकाने, दूध संस्‍था, दूध वितरण व्यवस्‍था वगळण्यात आली आहे. या दरम्‍यान करवीर पोलिस स्टेशनच्या सूचनेनुसार या कालावधीत व्हिडिओ चित्रीकरणही करण्यात येणार आहे. या चित्रकरणात कोणीही नागरिक मुक्त संचार करताना आढळून आल्‍यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. त्‍यामुळे या बंदच्या काळात वडणगे आरोग्‍यदायी आणि कोरोना मुक्‍त ठेवण्यासाठी ग्रामस्‍थांनी सहकार्य करावे, असे वडणगे ग्रामपंयातीने आवाहन केले आहे. 

दरम्‍यान, तीन दिवस गाव बंद राहणार असल्‍याच्या पार्श्वभूमीवर आज ग्रामपंचायती समोरील भाजीपाला मार्केटमध्ये लोकांनी मोठी गर्दी केली होती.