Sat, May 30, 2020 02:09होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : बिष्‍णोई टोळीला जेरबंद करणाऱ्या पथकास १ लाखाचे बक्षीस 

कोल्‍हापूर : बिष्‍णोई टोळीला जेरबंद करणाऱ्या पथकास १ लाखाचे बक्षीस 

Last Updated: Feb 20 2020 2:18PM
कोल्‍हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर पोलिस दलावर बेछूट गोळीबार करून महा-मार्गावर दहशत माजविणार्‍या जोधपूर (राजस्थान) येथील कुख्यात ‘007 बिष्णोई’ टोळीच्या म्होरक्यासह तीन साथीदारांना अटक करण्यात आली होती. कोल्‍हापूर पोलिसांच्या या धाडसी कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक डॉक्‍टर अभिनव देशमुख यांनी पथकास १ लाख रूपायांचे रोख पारितोषिक दिले.

श्यामलाल बिष्णोईसह साथीदारांवर राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेशसह अन्य राज्यांत 48 पेक्षा जास्त गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या टोळीने प्रचंड दहशत निर्माण केली आहे. खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, सामूहिक अत्याचारासह दरोडा, अमली पदार्थ, शस्त्र तस्करीच्या गुन्ह्यात टोळीतील साथीदार दीड वर्षापासून मोस्ट वॉन्टेड आहेत.

दिनांक २८ फेब्रुवारी रोजी किणी टोल नाका येथे स्थानिक गुन्हे शाखेने 007 बिष्णोई गँगचा गँग लिडर श्याम पुनिया व त्याच्या दोन साथीदार यांना जेरबंद केले होते. या धाडसी कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक डॉक्‍टर अभिनव देशमुख यांनी १ लाख रूपयांचे पारितोषिक दिले आहे.