Sun, Jul 05, 2020 02:41होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : काखे गावात बालविवाह रोखला

कोल्हापूर : काखे गावात बालविवाह रोखला

Published On: Dec 02 2017 1:08AM | Last Updated: Dec 02 2017 1:08AM

बुकमार्क करा

मोहरे : वार्ताहर

कोडोली पोलिस ठाण्याच्या व चाईल्ड हेल्पलाईन यांच्या सतर्कतेमुळे काखे (ता. पन्हाळा) येथील बालविवाह रोखण्यास पोलिस यंत्रणेस यश आले. याप्रकरणी तिच्या आई-वडिलांचे समुपदेशन पोलिस व चाईल्ड हेल्पलाईन यांच्यावतीने करण्यात आले.

काखे (ता. पन्हाळा) येथील अल्पवयीन मुलीचा नरंदे (ता. हातकणंगले) येथील तरुणांशी विवाह निश्‍चित झाला होता. त्याची माहिती कोल्हापूर येथील चाईल्ड हेल्पलाईनला मिळाली होती. चाईल्ड हेल्पलाईनचे शिवाजी माळी यांनी या बाबतची माहिती कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विकास जाधव यांना दिली. या घटनेची खात्री करण्यासाठी कोडोली पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस डोईफोडे यांचे पथक तत्काळ काखे येथे दाखल झाले आणि अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची खात्री करून घेतली.

त्यामुळे मुलीसह तिच्या आई-वडिलांना पोलिस ठाण्यात बोलविण्यात आले. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे, असे समजावून सांगून त्यांचे समुपदेशन केले. यावेळी चाईल्ड हेल्पलाईनच्या अनुजा खुदळे अश्‍विनी पाटील, भाग्यश्री दलवाई, शिवाजी माळी यांच्यासह कोडोली पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी मुलीसह आई-वडिलांना पोलिसांची मदत देऊन कायद्याच्या समुपदेशासाठी कोल्हापूर येथील बालकल्याण समितीकडे पाठविले आहे. अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याचे निदर्शनास आलेस कोल्हापूर चाईल्ड हेल्पलाईन यांच्या टोल फ्री क्र. 1098 वर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.