Wed, Feb 19, 2020 09:08होमपेज › Kolhapur › कडकनाथ १०० रुपयांत अन् अंडे ५ रुपयांत!

कडकनाथ १०० रुपयांत अन् अंडे ५ रुपयांत!

Published On: Sep 12 2019 10:35AM | Last Updated: Sep 12 2019 10:35AM

 कोल्‍हापूर :  मुरगुड येथे कडकनाथ कोंबडी विक्रीसाठी लावलेला टेम्पो, खरेदी करताना ग्राहक.मुदाळतिट्टा : प्रतिनिधी

नोकरी नाही, उद्योग करून पोट भरता येईल, काहीतरी कमवता येईल या आशेने युवक- शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय सुरू केला. पण काही कमवायचा अगोदरच सर्वच गमवायची वेळ या व्यावसायिकांची झाल्याने शिल्लक आहे ते विकावे अन् कर्जाचे व्याज तरी भागवावे यासाठी कडकनाथ कोंबडी घ्या फक्त १०० रुपयांत अन् अंडे घ्या फक्त ५ रुपयांत म्हणत विकण्याची वेळ आली आहे.

आठवडा बाजारा दिवशी हा विक्रीचा व्यवसाय सुरु असतानाच सोशल मीडियाच्या जाहीरात माध्यमातून ही युक्ती लढवली जात आहे. हा व्यवसाय करायला लावणार्‍या महारयत अग्रो इंडीया कंपनीने गाशा गुंडाळल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे. ज्यांच्याकडे हे पक्षी आणि अंडी आहेत त्यांच्यासमोर या पक्षांना खाद्य आणायचे कुठून?  त्यामुळे आहे ते पक्षी विकून किमान काढलेल्या कर्जाचे व्याज तरी भागवता येईल का, यासाठी हे तरुण शेतकरी धडपडत आहेत. सुमारे चारशे ते पाचशे रुपयाला विकली जाणारी कोंबडी केवळ शंभर रुपयाला सरसकट विक्री करण्याचा व ६० रुपयाचे अंडे अवघ्या पाच रुपात विकण्याचा फंडा वारला जात आहे.

आठवडा बाजारात टेम्पो, रिक्षाला स्पीकर लावून त्यावरून पुकारून ग्राहकाला आकर्षित केले जात आहे. स्वस्‍त मिळत असल्याने ग्राहक खरेदी करीत आहेत.काही  जण तर घरगुती कोंबडी पालनसाठी तीन चार खरेदी करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. या कोंबड्याना लागणारे खाद्य कंपनीच बंद झाल्याने मिळत नाही तर महाग असल्याने या व्यावसायिकांना ते विकत घेऊन घालणे परवडत नाही. खाद्याविना मरण्यापेक्षा विकलेलीच बरी म्हणून विकत आहेत.