Tue, Feb 18, 2020 05:35होमपेज › Kolhapur › इंडिया बिझनेस फोरमची शनिवारी कोल्हापुरात परिषद

इंडिया बिझनेस फोरमची शनिवारी कोल्हापुरात परिषद

Published On: Sep 18 2019 12:43PM | Last Updated: Sep 18 2019 12:45PM
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूरच्या उद्योग, व्यवसायाला जागतिक पातळीवर घेऊन जाण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरच्या उद्योगाला स्थान मिळवून देण्यासाठी ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम हे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. येत्या शनिवारी (दि. 21) या फोरमच्या वतीने एक परिषद आयोजित करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

मेक इन इंडिया, स्कील डेव्हलपमेंट या अभियानामुळे भारतासह विदेशी कंपन्यांना व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या व्यासपीठाच्या माध्यमातून अ‍ॅटो मोबाईल, अभियांत्रिकी, केमिकल, फार्मास्युटिकल, इलेक्ट्रॉनिक, अवजड उद्योग अशा क्षेत्रांत विविध व्यावसायिकांना जागतिक पातळीवर जोडण्याचा फोरमचा उद्देश आहे. 37 देशांमध्ये याचे 53 हजार सभासद आहेत.

जागतिक पातळीवरील उद्योजकांची व्यावसायिक भागीदारी करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 21 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता हॉटेल सयाजी येथे ही परिषद होणार आहे. त्यासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि ‘गोशिमा’ यांनी पुढाकार घेतला आहे. सायंकाळी 6.30 वाजता 25 उद्योजकांचा सत्कार केला जाणार आहे. 

या परिषदेसाठी इराण, अफगाणिस्तान व इथिओपियाचे कौन्सिल जनरल उपस्थित राहणार असून शाहू महाराज यांच्या हस्ते पुरस्कार वितरण केले जाणार आहे.