कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन
कोल्हापूर जिल्ह्यात आणखी १२ कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यात कोल्हापूर शहरातील ताराबाई पार्क -१, मंगळवार पेठ - १, सातपुते गल्ली हत्ती चौक - १ इचलकरंजी - १, राधानगरी- १ , पन्हाळा- १, कोडोली पन्हाळा- १, साजणी - हातकणंगले येथील १ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, सकाळी १० पर्यंत ४ रुग्ण आढळून आले होते. कोरोनाच्या रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होतच आहे.
अधिक वाचा : ‘140’ क्रमांकाबाबत घाबरू नका; कोल्हापूर सायबर सेलचे आवाहन
दरम्यान, काल (ता.१०) जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचा जणू कहर झाला. एकाच दिवशी तब्बल ५९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर मृत्यूंची संख्या २४ वर गेली आहे. दरम्यान (आज ता.११) १२ रुग्णांत भर पडल्याने रुग्ण संख्या ११४४ इतकी झाली आहे.
अधिक वाचा : कोल्हापुरात सुट्टीदिवशी बंद पाळा; अन्यथा कडक लॉकडाऊन
टिंबर मार्केट येथील राजाराम चौकातील माजी नगरसेवकाच्या आईचा कोरोनाने मृत्यू झाला. यासह रत्नागिरी जिल्ह्यातील एकाचा कोल्हापुरात मृत्यू झाला तर इचलकरंजीतील एकाचा रात्री उशिरा मृत्यू झाला. पन्हाळा तालुक्यातील करंजफेण येथे एकाच कुटुंबातील आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चंदगड तालुक्यातील तांबूळवाडीत दहा रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे समुह संसर्गाची भीती वर्तवण्यात येत आहे.