Sat, Jul 04, 2020 03:59होमपेज › Kolhapur › सुसाट वाहनांना कायद्याचा ‘ब्रेक’

सुसाट वाहनांना कायद्याचा ‘ब्रेक’

Published On: Dec 02 2017 1:08AM | Last Updated: Dec 02 2017 12:04AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : विजय पाटील 

एखादे अवजड वाहन रस्त्यांवरून हळू जात असेल, तर त्याला पाठीमागून हॉर्न वाजवून बेजार करू नका. कारण, अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारनेच माल वाहतूक करणार्‍या वाहनांना कायद्याने ब्रेक लावला आहे. नव्या आणि जुन्या सर्वच माल वाहतूक वाहनांना वेग नियंत्रक उपकरण बसवण्याची अंमलबजावणी वेगात सुरू आहे. 

महामार्ग आणि इतर सर्वच रस्त्यांवर वाहनांचा सुसाट वेग अलीकडे चिंताजनक बनला आहे. कारण, वाहनांच्या अतिवेगामुळे अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. वाढत्या अपघातांची दखल घेत थेट न्यायालयाने  महामार्गांवरील दारू दुकानांबाबत ठोस भूमिका घेतल्याचे उदाहरण ताजे आहे. आता याच धर्तीवर केंद्र सरकारने माल वाहतूक करणार्‍या वाहनांना स्पीड गव्हर्नर सिस्टीम बसवण्याची सक्‍ती केली आहे. यामुळे नव्या सर्वच वाहनांना वेग मर्यादा आली आहे. 

वेग मर्यादा उपकरण असल्याशिवाय जुनी वाहने पासिंग होत नाहीत. देशभर याबाबत वेगाने अंमलबजावणी सुरू आहे. ही अंमलबजावणी देशभर सुरू आहे. फक्‍त कोल्हापूरचा विचार केला तर 15 हजार मालवाहतूक ट्रक आणि 10 हजार टेम्पो आहेत. याचा अर्थ इतक्या मोठ्या प्रमाणावरील वाहनांवर आता कायद्याने वेग प्रतिबंध केला आहे. 

महिन्याला साडेपाच हजार पासिंग

महिन्याला सरासरी 3 हजार अवजड वाहनांचे पासिंग केले जाते. तर इतर मालवाहतूक अडीच हजार वाहने पासिंग होतात. याचा अर्थ महिन्याला साडेपाच हजार जुनी वाहने पासिंग केली जातात. या सर्व वाहनांना उपकरण सक्‍तीचे असल्याने त्याचा चांगला परिणाम होत आहे.