Sun, Jul 05, 2020 17:06होमपेज › Kolhapur › इचलकरंजीत २ कोटी ७२ लाख ५० हजारांची रोकड पकडली

इचलकरंजीत २ कोटी ७२ लाख ५० हजारांची रोकड पकडली

Last Updated: Oct 18 2019 2:17PM

इचलकरंजी नजीक याच वाहनातून रोकड पकडण्यात आली.इचलकरंजी : वार्ताहर              

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी जवळ असलेल्या कबनूर येथील तपासणी नाक्यावर 2 कोटी 72 लाख 50 हजार रुपयांची रोकड घेवून जाणारी बोलेरो पिक अप वाहन शिवाजीनगर पोलिस व निवडणूक विभागाच्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाने पकडली. 

प्राथमिक चौकशीअंती ही रक्कम कोल्हापुरातील रत्नाकर बँकेची असल्याची माहिती पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली. कागदपत्रांची खातर जमा व निवडणूक विभागाला रक्कमेविषयी कळवण्यात न आल्याने मोटारीसह रक्कम पोलिसांनी ताब्यात घेतली. याबाबतची माहिती आयकर विभागालाही कळविण्यात आली.

शुक्रवारी दुपारी पावणे बाराच्या सुमारास कबनूर दर्ग्याजवळील तपासणी केंद्रावर कोल्हापूरहून इचलकरंजीकडे येणारी बोलेरो पिकअप (एमएच-04-एचएस-1308) ही मोटार शिवाजीनगर पोलिस व स्थिर पथकाने तपासली. यावेळी मोटारीत 2 कोटी 72 लाख 50 हजारांची रोकड आढळून आली.

त्यानंतर पथकाने ही गाडी थेट पोलिस ठाण्यात आणली. मोटारीत असलेल्या पाच कर्मचार्‍यांची चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीत रत्नाकर बँकेची ही रक्कम असल्याचे समोर आले. यावेळी गाडीत असणार्‍या बँकेच्या कर्मचार्‍यांनी ही रक्कम इचलकरंजी शाखेत देण्यासाठी आल्याचे सांगितले.