Sat, Feb 29, 2020 13:15होमपेज › Kolhapur › सर्किट बेंच स्थापनेबाबत मी सकारात्मक : न्यायमूर्ती  प्रदीप नंद्रजोग

सर्किट बेंच स्थापनेबाबत मी सकारात्मक : न्यायमूर्ती  प्रदीप नंद्रजोग

Published On: Jul 20 2019 3:31PM | Last Updated: Jul 20 2019 3:51PM
कोल्हापूर : प्रतिनिधी

मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात स्थापनेबाबत मी सकारात्मक असून याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे आश्वासन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांनी सांगितले. खंडपीठ कृती समिती शिष्टमंडळाने शनिवारी (दि. २०) मुंबईत भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत हे आश्वासन दिल्याचे वकीलांनी सांगितले.

सर्किट बेंच कोल्हापुरात करावे, यासाठी कोल्हापूरसह सहा जिलह्यांसाठी ३५ वर्षे लढा सुरू आहे.  कोल्हापुरातील न्याय संकुलात होणाऱ्या वकिलांच्या समुपदेशन आणि प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन आमंत्रण देण्यासाठी वकिलांचे शिष्टमंडळ आज भेटले. यावेळी झालेल्या चर्चेत कोल्हापूरला सर्किट बेंच करण्यासंदर्भातील मी सकारात्मक आहे लवकरच हा निर्णय घेऊ,असेही मुख्य न्यायमूर्ती नंद्रजोग यांनी शिष्टमंडळाशी बोलताना सांगितल्याचे  बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. रणजीत गावडे यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.

शनिवारी दुपारी १ तास चर्चा झाली.  शिष्टमंडळामध्ये खंडपीठ कृती समितीचे  निमंत्रक आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. रणजीत गावडे, ज्येष्ठ विधीज्ञ महादेवराव आडगुळे, अॅड. संतोष शहा, अॅड. आर ए कापसे, अॅड. सचिन पाटील, अॅड. पी आर पाटील आ दी वकिलांचा समावेश होता.