Sat, Aug 08, 2020 03:18होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : हुपरीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या गाट

कोल्हापूर : हुपरीच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या गाट

Published On: Dec 14 2017 12:30PM | Last Updated: Dec 14 2017 1:27PM

बुकमार्क करा

हुपरी : प्रतिनिधी

हुपरी नगरपरिषदेत भाजपच्या नगराध्यक्ष्या जयश्री गाट 2 हजार मताधिक्क्याने विजयी झाल्या. त्यांनी ताराराणी आघाडीच्या सीमा जाधव, शिवसेनेच्या विभल जाधव यांचा पराभव केला. नगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी काल मतदान झाले होते. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. भाजपने ७ जागांवर, ताराराणी आघाडीने ५ तर आंबाबाई आघाडी २ जागांवर तर २ जागी अपक्ष उमेदवार निवडून आले. 

हुपरी नगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीसाठी काल (बुधवार दि.१३) चुरशीने 85.18 टक्के मतदान झाले होते.. पहिली नगरपालिका असल्याने मतदारांमध्ये मोठा उत्साह होता.  काही ठिकाणी किरकोळ बाचाबाची वगळता मतदान शांततेत पार पडले होते.