Mon, Jan 18, 2021 09:02होमपेज › Kolhapur › सुवर्णपदक भारतात; प्रशस्तीपत्र  तुर्कीतच! 

सुवर्णपदक भारतात; प्रशस्तीपत्र  तुर्कीतच! 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

राशिवडे : प्रवीण ढोणे

राशिवडेचा नवोदित मल्ल कु. सौरभ पाटील याने तुर्की येथील जागतिक कुमार केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देऊन यशाचा झेंडा फडकावला होता. परंतु, या स्पर्धा होऊन दीड वर्ष उलटले तरी या स्पर्धेचे प्रशस्तीपत्र केवळ क्रीडा कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे तुर्कीतच राहिले आहे.

कु. सौरभ हा कोणतीही कुस्तीची पार्श्‍वभूमी नसताना चार वर्षांपासून जिल्हा स्तरापासून जागतिक स्तरापर्यंत चमकत आहे. सौरभने 2016-17 मध्ये तुकीर्र् येथे झालेल्या जागतिक कुमार केसरी स्पर्धेत 60 किलो वजनगटामध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. कुमार केसरी स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याला तब्बल बत्तीस वर्षांनी सुवर्णपदक मिळाल्याने सौरभचे थाटात स्वागत करण्यात आले होते. परंतु, त्याला प्रशस्तीपत्रच अद्याप मिळालेले नाही. केवळ क्रीडा कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे दीड वर्ष उलटले तरी हे प्रशस्तीपत्र तुकीर्र्तच राहिले आहे. कु.सौरभच्या करियरसाठी हे तुकीर्र्त राहिलेले  प्रशस्तीपत्र अडथळ्याचे ठरत आहे. सौरभची आर्थिक स्थिती गरिबीची आहे. सध्या तो नोकरीच्या शोधात आहे, या  प्रशस्तीपत्राअभावी त्याला अडथळे निर्माण होत आहेत. 

Tags : Kolhapur, Kolhapur News, Gold medal, India, Certificate,  Turkey


  •