Wed, May 12, 2021 02:19
गोकुळ निवडणुक: चौथ्या फेरीअखेर सतेज पाटलांची पकड कायम, विद्यमान अध्यक्ष रविंद्र आपटे पराभवाच्या छायेत

Last Updated: May 04 2021 6:41PM

कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

गोकुळच्या चौथ्या फेरीअखेर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ गटाच्या १३ उमेदवारांनी आघाडी कायम ठेवली आहे. तर सत्ताधारी गटाच्या ३ जागा आघाडीवर आहेत. दरम्यान विद्यमान चेअरमन रविंद्र आपटे पराभवाच्या छायेत आहेत. यामुळे विरोधी गटाची गोकुळवर मजबूत पकड होताना दिसत आहे. तसेच विरोधी गटाकडून विश्वास नारायण पाटील, रणजीत पाटील, शशिकांत चुयेकर, नाविद मुश्रीफ, कर्णसिंह गायकवाड, बाळासाहेब चौगुले, अरुण डोंगळे, नंदकुमार ढेंगे, अभिजीत तायशेटे, अजित नरके, उदय पाटील यांनी आघाडी घेतली आहे. 

चौथ्या फेरीअखेर आघाडीवर असलेले राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे उमेदवार......
१.  अरुनकुमार डोंगळे
२. अभिजित तायशेटे
३. विश्वास नारायण पाटील
४. अजित नरके
५. शशिकांत पाटील-चुयेकर 
६.  किसन चौगुले
७.  नविद मुश्रीफ
८. रणजित पाटील
९. नंदकुमार डेंगे
१०. बाबासाहेब चौगुले
११. करणसिंह गायकवाड
१२. प्रकाश पाटील 
१३. एस आर पाटील. 

सत्ताधारी गटाचे आघाडीवर असलेले उमेदवार
१. अमरीश घाटगे    ( सत्ताधारी आघाडी )
२. बाळासो खाडे  ( सत्ताधारी आघाडी)
३. चेतन नरके     ( सत्ताधारी आघाडी )
 

कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागुन राहिलेल्या गोकुळ दुध संघाची मतमोजणी जसजशी पुढे जाईल तसा निकाल स्पष्ट होत आहे. दरम्यान विरोधी पॅनेलची दुसऱ्या फेरी अखेर विरोधी गटाचे ११ उमेदवार आघाडीवर आहेत तर सत्ताधारी गटाचे ५ उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. यामध्ये सत्ताधाऱ्यामधील बाळासाहेब खाडे, अंबरीश घाटगे, चेतन नरके यांनी आघाडी घेतली आहे.

तसेच विरोधी गटाकडून विश्वास नारायण पाटील, रणजीत पाटील, शशिकांत चुयेकर, नाविद मुश्रीफ, कर्णसिंह गायकवाड, बाळासाहेब चौगुले, अरुण डोंगळे, नंदकुमार ढेंगे, अभिजीत तायशेटे, अजित नरके, उदय पाटील यांनी आघाडी घेतली आहे. 

गोकुळच्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत महिला गटात विरोधी गटातील अंजना रेडेकर यांनी १८४ बाजी मारली तर अखेरपर्यंत पिछाडीवर असलेल्या शौमिका महाडिक यांनी सुश्मिता पाटील यांचा ४६ मतांनी पराभव केला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या गोकुळच्या निवडणुकीत विरोधी पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाने विजयी सलामी देत राखीव गटात विजय मिळविला.

अनुसूचित जाती जमाती गटातून माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी विलास कांबळे, भटक्या विमुक्त जाती जमाती गटात बयाजी शेळके यांनी विश्वास जाधव, इतर मागासवर्गीय गटात अमरसिंग पाटील आणि पी. डी. धुंदरे यांचा पराभव केला आहे. अमरसिंग पाटील यांनी ४३६, सुजित मिणचेकर यांनी ३४६ तर बयाची शेळके यांनी २३९ मतांनी विजय मिळविला.