Sun, Feb 28, 2021 06:37
ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांची दै.‘पुढारी’ला सदिच्छा भेट

Last Updated: Jan 18 2021 2:22AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

युनेस्को व लंडनस्थित वार्की फाऊंडेशनचा सात कोटी रुपयांचा पुरस्कार ‘ग्लोबल टीचर प्राईज अ‍ॅवॉर्ड’ विजेते, सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी शाळेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी रविवारी दै. ‘पुढारी’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. 

यावेळी त्यांनी दैनिक ‘पुढारी’चे संस्थापक-संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. दै. ‘पुढारी’चे समूह कार्यकारी संपादक सुरेश पवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी दै. ‘पुढारी’चे सहायक सरव्यवस्थापक (प्रशासन) राजेंद्र मांडवकर, अखिल भारतीय शिक्षक महासंघाचे कार्यवाह प्रा. अशोक पाटील उपस्थित होते.