Fri, Dec 13, 2019 15:46होमपेज › Kolhapur › चार कोटींची फसवणूक; तिसरा आरोपी जाळ्यात

चार कोटींची फसवणूक; तिसरा आरोपी जाळ्यात

Published On: Sep 21 2019 1:31AM | Last Updated: Sep 21 2019 12:24AM
चंदगड : प्रतिनिधी

चंदगड तालुका व परिसरातील काजू उत्पादक शेतकर्‍यांना भूलथापा देऊन सुमारे चार कोटी रुपयांची फसवणूक करून पसार झालेल्या दोन व्यापार्‍यांना आठ दिवसांपूर्वी अटक केली होती. दरम्यान, यामधील तिसरा व्यापारी प्रदीप पाटील (रा. जयसिंगपूर) फरार होता. त्यालाही पोलिसांनी अटक केली.

सिद्धेश चव्हाण (रा. भांडुप  मुंबई)  व प्रदीप पाटील (रा. जयसिंगपूर) यांनी चंदगड तालुक्यातील काजू उत्पादक व शेतकर्‍यांकडून बाजारभावापेक्षा जास्त दराने काजू गर खरेदी करून मुंबईच्या व्यापार्‍यांना त्याची विक्री करून रक्‍कम परत केली. प्रथम शेतकर्‍यांचा विश्‍वास संपादन केला आणि त्यानंतर त्यांनी अनेक जणांची लुबाडणूक केली. वेळेत पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. यामध्ये काजू उत्पादकांची सुमारे  चार कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.

गुन्ह्याचा तपास पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी केला. प्रदीप पाटील याला अटक करून चंदगड न्यायालयात हजर केले असता 5  दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाले दिले आहेत. अधिक तपास आर्थिक गुन्हे  शाखा करीत आहे.