Thu, Jul 02, 2020 11:09होमपेज › Kolhapur › वाहतुकीचे नियम पाळा; अपघात टाळा

वाहतुकीचे नियम पाळा; अपघात टाळा

Published On: May 09 2018 2:04AM | Last Updated: May 08 2018 11:26PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

वाढती लोकसंख्या आणि त्याच्या कित्येकपटीने सात्तत्याने वाढत जाणारी वाहणांची संख्या यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी, लहान-मोठे अपघात अशा घटना सात्तत्याने सर्वत्र घडताना दिसत आहेत. अनेक अपघातांत बालचमूंसह ज्येष्ठनागरिकापर्यंतच्या लोकांचे बळी जात आहेत. अपघातात बळी गेलेल्यांमध्ये अलीकडे तरुणांची संख्या मोठी आहे. बेदरकारपणे वाहन चालविणे, नियमांचे पालन न करणे या व अशा विविध कारणांनी देशाचे भविष्य असणारी तरुणाई आपले अस्तित्व गमावू लागली आहे. या विषयाचे गांभीर्य ओळखून सोशल मीडियावरून ‘तरणीबांड मुलं  किडामुंगींसारखी मरायला नकोत...’ या  आशयाची पोस्ट प्रसारित करण्यात आली आहे. सोशल मीडियाचा बहुतांशी गैरवापर होत असताना जनमानसात ‘अपघात’ आणि तो होऊ नये यासाठीची काळजी  या विषयी जनजागृती निर्माण करणार्‍या या पोस्टमुळे लोकांना विचार करणे भाग पडले आहे. या व अशा सामाजिक पोस्टचा विचार आणि कृती लोकांनी करणे काळाची गरज आहे.  

 पालक म्हणून हे नक्की करा...  
लायसन्स असल्याशिवाय मुलांना कोणतेही वाहन हातात देऊ नका.  
आपले मित्र, नातेवाईक यांनी मुलाचे रफ ड्रायव्हिंगबाबत सांगितल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता त्यात सुधारणा करा.  
मुलाला बाईक घेताना सोबत हेल्मेट आवर्जुन घ्या. मुलगा असो वा मुलगी हेल्मेट वापराची सक्ती करा.  
उठसूट गाडी न वापरण्याचा सल्ला जाणीवपूर्वक मुलांना द्या. वाहनाला पर्याय म्हणून सायकलचा वापर करा. 

तरुणांकडून या गोष्टींची अपेक्षा :
वाहतुकीच्या प्रत्येक निमयाचे बारकाईने पालन करा.  ? उपाशीपोटी अवजड वाहने हाताळू नका. ? कोणतेही वाहन हे घाई-गडबडीने जाण्यासाठी नसून सोयीप्रमाणे जाण्यासाठी आहे हे लक्षात घ्या. ? कोणाच्याही गाडीवर ट्रिपल सीट प्रवास करू नका. ? वाहनावर आणि स्वतःच्या ताकदी बद्दल फाजील आत्मविश्‍वास  नको. ? गाडीची खरच गरज आहे का हा प्रश्‍न स्वतःला विचारूनच गाडी स्टार्ट करा. ? वळणावर अजिबात ओव्हरटेक नको. ? गावात 20 ते 30 आणि मोठ्या व गावाबाहेरच्या रस्त्यावर 40 ते  50 स्पीड पुरेसा आहे.  यापेक्षा जास्त स्पीड नको. ? मित्रांच्या नादाने रेसिंग किंवा स्टंट करू नका. ? रस्त्याच्या कडेला पांढरा पट्टा असल्यास गाडी हळू चालवा आणि रस्त्याच्या खाली उतरू नका. ? रस्त्याच्या कडेला पिवळा पट्टा असल्यास गाडी हळू चालवा आणि रस्त्याच्या खाली अजिबातच उतरू नका. बाजूला ओढा किंवा खड्डा असण्याची शक्यता आहे. ? आपले काम झाल्यावर टाईमपास नको. वेळेत घरी निघा.... उशीर झालाच तर वेगाने प्रवास करून नका. ? डंपर, उसाचा ट्रक, सिमेंट- काँक्रिट नेणारा ट्रक, पोकलँड, कंटेनर अशा अवजड वाहनाच्या अधिक जवळून प्रवास नको. ? मोबाईल कानाला लावून किंवा इअरफोन लावून गाडी चालवू नका. कर्णकर्कश हॉर्न, प्रेशर हॉर्न वाजवून इतरांना नाहक त्रास देऊ नका.

वाहनांची काळजी सर्वात महत्त्वाची : 
? गाडीचे योग्य वेळी सर्व्हिसिंग झालेले असले पाहिजे. ? दोन्ही ब्रेक लागतात का याची खात्री करा. ? दोन्ही ब्रेकचा वापर करा. पुढचा ब्रेक लावल्यास तोंडावर पडतो हा गैरसमज आहे. ? गाडीचा टेल लँप आणि ब्रेकलाईट लागणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ? वळताना इंडिकेटरचा वापर करा. 

मुलांनो हे आवश्य आणि आवर्जुन करा : 
? आपल्या बेशिस्त मित्रांची माहिती त्यांच्या आई-वडिलांना ताबडतोब द्या. ? दिवसासुद्धा हेडलाईट लावून गाडी चालवा. ? वाहन शक्यतो पिवळ्या रंगाचे घ्या. शास्त्रीय दृष्ट्या पिवळा रंग कमी प्रकाशातही दिसतो. ते शक्य नसल्यास गाडीवर मागे-पुढे पिवळे रेडियम लावा. ? रात्री गाडी चालविताना हिरवे किंवा काळे कपडे वापरू नका. पिवळ्या रंगाचे हेल्मेट किंवा जॅकेट वापरा. ?  पुढच्या वाहनापासून किमान 10 ते 15  फूट इतके सुरक्षित अंतर ठेवा. ? टू व्हिलर वापरताना रस्त्यावर आपण पाहुण्यासारखे वागावे. मोठ्या वाहनांचा आदर करावा. ? अवजड वाहन चालविणार्‍या चालकांची खोड काढणे, त्यांच्याशी स्पर्धा करणे अशा गोष्टी करू नका. 

सर्वांत महत्त्वाचे ... 
बेशिस्तपणे वाहन चालविणार्‍या मुलांची माहिती त्यांच्या पालकांना किंवा पोलिस स्टेशनला द्यावी. 
मुलांनो लक्षात ठेवा अपघात प्रथम मनात घडतो आणि नंतर रस्त्यावर घडतो. 
प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला ही माहिती वाचायला सांगावी किंवा वाचून दाखवावी.
 

Tags : kolhapur, transport,  accidents