Mon, Jan 18, 2021 09:36होमपेज › Kolhapur › जिल्ह्याचा विकासाचा बॅकलॉग भरून काढू

जिल्ह्याचा विकासाचा बॅकलॉग भरून काढू

Last Updated: Jan 04 2020 1:07AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात विकासाचे काय झाले, यावर आम्ही बोलणार नाही. रस्ते, थेट पाईपलाईन, सिंचन योजना आदी  रखडलेले प्रकल्प प्राधान्याने मार्गी लावून जिल्ह्याचा विकासाचा बॅकलॉग भरून काढू, अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री सतेज पाटील आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शुक्रवारी दसरा चौकात सत्कार समारंभात दिली. महिन्यातून एकदा कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे जनता दरबार घेऊन नागरिकांच्या शासकीय कार्यालयात रखडलेल्या कामांची पुढील महिन्याभरात पूर्तता केली जाईल. जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीने बाजी मारली. हीच मोट गोकुळ निवडणुकीतही कायम राहील, असेही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

नूतन मंत्र्यांचे छत्रपती महाराणी ताराराणी चौकात कार्यकर्त्यांनी  जल्‍लोषी स्वागत केले. मिरवणुकीने दसरा चौकात येऊन मंत्री हसन मुश्रीफ, सतेज पाटील व राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्?या पुतळ्?याला पुष्?पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर कार्यकर्त्यांनी तिन्ही मंत्र्यांना खांद्यावरून व्यासपीठावर नेले. येथून कार्यकर्त्यांनी मुश्रीफ, पाटील व यड्रावकर यांना खांद्यावर उचलून व्?यासपीठावर नेले.  डी.  वाय. पाटील  अभिमत विद्यापीठाचे कुलपती संजय डी. पाटील यांच्या हस्ते नूतन मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, खा. प्रा. संजय मंडलिक, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, आ. राजूबाबा आवळे, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, उपमहापौर संजय मोहिते, प्रतिमा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

शोषितांना न्याय देण्याचे बळ अंबाबाईने द्यावे ः मुश्रीफ

मंत्री मुश्रीफ म्हणाले, 35 वर्षांच्या राजकीय वाटचालीत प्रथमच भर दुपारी अशी विराट मिरवणूक बघितली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधी पक्ष म्हणून मुंबईला गेलो होतो आणि मंत्री म्हणून परत आलो, ही आई अंबाबाईची कृपा आहे. परमेश्‍वरालाही भाजपची सत्ता यावी हे कदाचित मान्य नसावे. राजर्षी शाहू महाराज यांनी दिलेल्या समतेचा संदेशाप्रमाणे समाजातील शोषित, वंचित घटकाला न्याय देण्याचे बळ अंबाबाईने आम्हाला द्यावे. येत्या काळात जिल्ह्याच्या विकासासाठी भरघोस निधी आणू. विधानसभा जिंकली. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेतही बाजी मारली. आता हाच फॉर्म्युला गोकुळमध्ये राहील. गोकुळची आमच्यापैकी कोणाला मालकी नको आहे; तर सभासदांच्या मालकीचा गोकुळ दूध करायचा आहे. गोकुळ दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी गोकुळच्या निवडणुकीत सहभाग घेणार आहे. त्यात महाविकास आघाडीला नक्‍कीच यश मिळेल.

रेंगाळलेले प्रश्‍न मार्गी लावणार ः सतेज पाटील

राज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, जिल्हा पारिषदेची राहिलेली विकेट घ्यायची बाकी होती, म्हणून ती पडल्यावरच कोल्हापुरात येण्याचे ठरविले होते. जिल्ह्यातील महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यात लागू झाला. आता गोकुळमध्येही यशस्वी होईल. थेट पाईपलाईन पाणी योजना पूर्ण करण्याला प्राधान्य राहील. अंबाबाई विकास आराखडा, रस्ते, खंडपीठ, शाहू जन्मस्थळाचा विकास हे रखडलेले प्रश्‍न सोडविणारच. महिन्यातून एकदा होणार्‍या जनता दरबारात आम्ही तिघे मंत्री हजर असू. काही कामानिमित्त जमले नाही तर तिघांपैकी एकजण नक्‍कीच उपस्थित राहून जनतेची कामे मार्गी लावली जातील.

ठाकरेंनी शब्द पाळला ः यड्रावकर

राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर म्हणाले, दोन पिढ्या पक्षात काम करूनही मला अपक्ष लढावे लागले. निवडून आल्यानंतर मी शिवसेनेच्या पाठीशी राहिलो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला मानसन्मान राखण्याचा शब्द दिला होता. तो शब्द पाळला. मला मंत्रिपद दिले. ठाकरे हे शब्दाला जागणारे नेते आहेत. हसन मुश्रीफ यांना मंत्रिमंडळात काम करण्याचा मोठा अनुभव आहे. सतेज पाटील यांच्या अनुभवाचाही मला फायदा होईल. त्यांच्या सोबत राहून काम करू.

सेनेचा मंत्री झाला नाही याची खंत ः मंडलिक

खा. मंडलिक म्?हणाले, तीनही पक्ष व घटक पक्षांची एक चांगली वज—मूठ कायम ठेवून जिल्ह्याच्?या विकासाची मोट बांधावी. जिल्?ह्यात उद्योग व रोजगाराचे प्रश्?न निर्माण होत असून अलीकडे उद्योगपतीही करत असलेली आत्?महत्?या हे चिंतेचे विषय आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग जिल्ह्यात जिल्?हा परिषदेप्रमाणे गोकुळमध्?येही यशस्वी होईल. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना माजी मुख्?यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कायम फोन यायचे. त्?यामुळे माझ्?या मनात यड्रावकर नेमके कोणाचे? असा प्रश्?न येत होता. पण त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. वास्?तविक शिवसेनेचा मंत्री झाला पाहिजे होता. पण तो झाला नाही, याची खंत आहे.

आ. चंद्रकांत जाधव यांनी कोल्हापूर जिल्ह्याला तीन मंत्रिपदे मिळाली. हे तिन्ही मंत्री जिल्ह्याचा चांगला विकास करतील, असा विश्‍वास व्यक्‍त केला. प्रास्ताविक माजी महापौर आर. के. पोवार यांनी केले. आभार महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी मानले. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.