Tue, Sep 22, 2020 07:23होमपेज › Kolhapur › राष्ट्रीयीकृत बँकेत आढळल्या बनावट नोटा

राष्ट्रीयीकृत बँकेत आढळल्या बनावट नोटा

Published On: Jun 13 2019 1:33AM | Last Updated: Jun 13 2019 12:59AM
कोल्हापूर : प्रतिनिधी 

राजारामपुरीतील एका राष्ट्रीयीकृत बँकेत पाचशेच्या दहा ते पंधरा बनावट नोटा  कॅशिअरच्या निदर्शनास आल्या. त्यांनी  पोलिसांना  माहिती कळविली; पण  रात्री उशिरापर्यंत याबाबतची नोंद झाली नव्हती. बुधवारी दुपारी राजारामपुरीतील एका बँकेत पैसे मोजताना काही संशयास्पद नोटा कॅशिअरला मिळून आल्या. ही बाब त्यांनी वरिष्ठांना सांगितली.  10 ते 15 नोटा बनावट असल्याची चर्चा होती. बँकेच्या अधिकार्‍यांनी तक्रारीची हालचाल सुरू केली होती; मात्र झाली नव्हती. 

राजारामपुरी पोलिस ठाण्याकडे बनावट नोटांबाबत अद्याप तक्रार दाखल झालेली नाही. अशी तक्रार दाखल झाल्यास त्याची गांभीर्याने दखल घेऊन तपास केला जाईल, असे राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले.