Fri, Nov 27, 2020 11:20होमपेज › Kolhapur › कोरोनामुळे कोल्हापुरातील यंदाच्या शाही दसरा सोहळ्यावर प्रतिबंध

कोरोनामुळे कोल्हापुरातील यंदाचा शाही दसरा सोहळा सार्वजनिक स्वरुपात नाही 

Last Updated: Oct 19 2020 9:17PM

file photoकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील दसरा चौकात होणाऱ्या शाही दसरा सोहळ्याबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाचा शाही दसरा सोहळा सार्वजनिक स्वरुपात होणार नसल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. 

कोल्हापूरच्या शाही दसर्‍याला पारंपरिक महत्त्व आहे. हा सोहळा दरवर्षी दसरा चौकात होतो. मात्र, गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंध घातला आहे. दसरा चौकात कोणालाही प्रवेश नाही. विजयादशमीदिनी होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम आणि उत्सवाचे स्वरुप वैयक्तिक, घरगुती राहतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.

कोल्हापूर शहर व परिसरात नवरात्री कालावधीत तसेच दसरा चौक व शहरांत २५ ऑक्टोबर रोजी कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक धार्मिक, विजयादशमीचे सोने लुटणे, सिमोल्लंघन आदी गर्दीचे कार्यक्रम करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व विश्वस्त, छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्ट यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार कोल्हापूर येथे २५ ऑक्टोबर रोजी दसरा चौकात होणारा शाही दसरा व विजयादशमीनिमित्त सीमोल्लंघन कार्यक्रम कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.