Mon, Sep 21, 2020 19:06होमपेज › Kolhapur › वडाप जीप झाडावर आदळून चालक ठार, 11 जण जखमी

वडाप जीप झाडावर आदळून चालक ठार, 11 जण जखमी

Last Updated: Feb 14 2020 2:09AM
देवाळे : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर - राधानगरी मार्गावरील देवाळे (ता. करवीर) नजीक चालकाचा ताबा सुटून वडाप जीप झाडाला धडकली. या धडकेत चालक प्रकाश शंकर बन्‍ने (वय 42, रा. हळदी, ता. करवीर) हा जागीच ठार झाला; तर 11 प्रवासी जखमी झाले. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास घडला. प्रकाश बन्‍ने हा कमांडर जीपमधून (एमएच 10 के 0263) कोल्हापूर ते भोगावती मार्गावर वडाप वाहतूक करीत होता. गुरुवारी दुपारी प्रवासी घेऊन भोगावतीकडे निघाला होता. करवीर तालुक्यातील देवाळेनजीक गाडीच्या समोरील बाजूस असणार्‍या संरक्षण गार्डवर असणारी स्टेपनी तुटून गाडीखाली आली. चालकाचा जीपवरील ताबा सुटून जीप रस्त्याकडेला असणार्‍या झाडाला जाऊन धडकली.

चालक प्रकाश बन्‍ने जीपमधून उडून चाकाखाली आला. त्याच्या डोक्याला जबर मार लागून त्याचा  जागीच मृत्यू झाला. प्रवासी मयुरी शिवाजी धनवडे (वय 21), शिवाजी चंद्रकांत धनवडे (32, रा. पुंगाव, ता. राधानगरी), आनंदा ज्ञानू वाडकर(50 रा. हळदी), बाबुराव राठोड (60), अंजली विठ्ठल चव्हाण (2), पार्वती विठ्ठल चव्हाण (23), जयश्री भोपाल चव्हाण (30), दीपा बाबुराव राठोड (18), गीता बाबुराव राठोड (40), लक्ष्मी बाबुराव राठोड (16), विठ्ठल लक्ष्मण चव्हाण (36, भटनूर, जिल्हा विजापूर सध्या रा. कुरूकली) अशी जखमींची नावे आहेत.

 "