Sun, Jul 12, 2020 19:33होमपेज › Kolhapur › गडकिल्ले भाड्याने देणे अत्यंत चुकीचा निर्णय; डॉ. जयसिंगराव पवार 

गडकिल्ले भाड्याने देणे अत्यंत चुकीचा निर्णय; डॉ. जयसिंगराव पवार 

Published On: Sep 06 2019 5:34PM | Last Updated: Sep 06 2019 5:34PM

डॉ. जयसिंगराव पवार कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन 

सरकारने आपली जबाबदारी झटकू नये. गडकोट-किल्ल्यांच्या जतन-संवर्धन आणि संरक्षणाचे काम पुरातत्व विभागाचे आहे. यामुळे सरकारने आपली जबाबदारी झटकू नये. पर्यटन विकासासाठी गडकिल्ले भाड्याने देणे अत्यंत चुकीचा आहे. यामुळे गडावर बांधकाम होणार असून पुरातत्वीय दृष्ट्याही हा प्रकार योग्य नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ इतिहास संशोधक  डॉ. जयसिंगराव पवार यांनी दिली. 

राज्याचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गडकिल्ले हेरिटेज पर्यटनाला चालना देण्यासाठी भाड्याने देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर अक्षरशः संतापाची  लाट उसळली असून राज्यातून  असंख्य प्रतिक्रिया येत आहेत.

हेरिटेज पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने राज्यातील गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी भाड्याने उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) २५ किल्यांची यादी तयार केली आहे. ऐतिहासिक पर्यटनस्थळे प्रसिद्ध असून पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते.