डॉ. तात्याराव लहाने यांच्या वेबिनारचे आज ‘टोमॅटो एफएम’वर प्रसारण

Last Updated: Jul 08 2020 1:29AM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 

दैनिक ‘पुढारी’च्या ‘पुढारी आरोग्य संवाद’ उपक्रमाअंतर्गत झालेल्या वेबिनारमधील डीएमईआरचे डायरेक्टर जनरल डॉ. तात्याराव लहाने यांचे मार्गदर्शन पुन्हा ऐकण्याची संधी लोकांना मिळणार आहे. दै. ‘पुढारी’च्या टोमॅटो एफ.एम.च्या माध्यमातून बुधवार, दि. 8 जुलै रोजी सायंकाळी 4 ते 5 या वेळेत या वेबिनारचे पुन:प्रसारण होणार आहे. 

कोरोना या जीवघेण्या आजाराची धास्ती प्रत्येकालाच आहे. देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. कोरोनाच्या जागतिक संकटाशी अवघे जग झुंजत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत लोकांना आधार वाटावा या उद्देशाने उपयोगी आणि मार्गदर्शक उपक्रमाचे आयोजन दैनिक ‘पुढारी’च्या वतीने नुकतेच करण्यात आले होते. ‘पुढारी आरोग्य संवाद’ या वेबिनारच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांचे अनमोल मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले. याचा लाभ हजारो लोकांनी घेतला. या वेबिनारमध्ये 2 जुलै रोजी डीएमईआरचे डायरेक्टर जनरल डॉ. तात्याराव लहाने यांचे ‘महाराष्ट्र कोरोनाशी कसा लढतोय?’ या विषयावर मार्गदर्शन झाले होते. हा वेबिनार टोमॅटो एफएमच्या माध्यमातून पुन्हा लोकांना ऐकायला मिळणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.