होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : लॉकडाऊन काळात घास भरवणारा खाकीतला माणूस (video)

कोल्हापूर : लॉकडाऊन काळात घास भरवणारा खाकीतला माणूस (video)

Last Updated: Mar 26 2020 4:06PM

कोल्हापूर पोलिसांकडून लॉकडाऊन काळात फुड पॅकेटचे वाटपकोल्हापूर : पुढारी डेस्क 

जेव्हा जेव्हा संकट येते तेव्हा कोल्हापूरकर एक-दुसऱ्याच्या मदतीला खांद्याला खांदा लावून उभे होतात. ते एकमेकांच्या गरजा आपली जबाबदारी म्हणून पार पाडताना दिसतात. याच्या आधी आलेल्या महापुरातही कोल्हापूरकरांनीच एकमेकांना आधार दिला. तर आताही कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन झाले असताना कोल्हापूर पोलिस गोरगरीब जनता आणि फुटपाथवर राहाणार्‍या बेघरांना अन्न आणि पाणी देऊन दातृत्वाची भूमिका पार पाडत आहेत. 

कोल्हापूर : कोरोना कर्फ्यू मजूर जनतेच्या पोटावर

कोरोना विषाणूचा संसर्ग कमी करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारपासून संपुर्ण देशात लॉकडाऊन केले आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे गोरगरीब जनता आणि फुटपाथवर राहणार्‍या बेघरांच्या अन्न, पाण्याचं प्रश्न समोर उभा होता. हा प्रश्न सुटताना दिसत आहे. लॉकडाऊन काळात घास भरवणारा खाकीतला माणूस येथे दिसत आहे.  बंदोबस्तावेळी रात्रंदिवस जनतेच्या सुरक्षतेसाठी राबणाऱ्या पोलिसांना अन्न आणि पाणी पोलिस खात्याकडून दिले जाते. त्यातीलच आपल्याला देण्यात येणाऱ्या जेवणातील काही घास गोरगरीब जनता आणि फुटपाथवर रहाणार्‍या बेघरांच्या तोंडात पडावे म्हणून कोल्हापूर पोलिसांकडून चौका चौकात फिरून फूड पॅकेट्सचे वाटप केले जात आहे. 

कोरोना : कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व्हॉट्सॲप क्रमांक सुविधा

पोलिस खात्याकडून माणूसकी दाखवली जात असून, ताराराणी चौक, मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्थानक, व्हिनस कॉर्नर, श्री अंबाबाई मंदिर परिसर येथे फूड पॅकेट्सचे वाटप गोरगरीब जनता आणि फुटपाथवर राहाणार्‍या बेघरांना करण्यात येत आहेत. 

मनपाच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना नेले बाहेर 

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालूक्यातील मोहोळ येथून काही नागरिक येथील पट्टणकोडोली विठ्ठल बिरदेवाच्या दर्शनाला आले होते. मात्र शनिवारनंतर लागलेल्या लॉकडाऊनमुळे ते येथेच अडकले. त्यानंतर याची माहिती मिळताच मनपाच्या कर्मचारी आणि पोलिसांनी मिळून त्यांना शाहू टोल नाक्याजवळील कोल्हापूर मनपा आणि एकटी संस्था संचलित बेघर पुरूष निवारा केंद्रात नेण्यात आले असून त्यांची प्राथमिक चाचणी सीपीआर येथे करण्यात येत आहे. तसेच त्यांच्या राहण्या, खाण्याची व्यवस्था एकटी संस्थेकडून करण्यात येत आहे. 

स्थानिक महिलांनी केले पोलिसांसाठी जेवण 

कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारावर शाहू टोल नाक्यावर लॉकडाऊनमुळे बंदोबस्तला असणाऱ्या पोलिसांचे आभार बापड कँम्प येथील कुंभार वसाहतीतील काही महिलांनी मानले आहेत. तसेच या महिलांनी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना जेवण दिले.