Sun, Jul 12, 2020 18:10होमपेज › Kolhapur › मतदार यादीतील नाव ‘डिलिट’;  वादावादीचा प्रकार

मतदार यादीतील नाव ‘डिलिट’;  वादावादीचा प्रकार

Published On: Apr 24 2019 1:38AM | Last Updated: Apr 24 2019 1:17AM
कोल्हापूर : 

मतदानाचा हक्‍क बजावण्यास आलेल्या मतदाराचे नाव ‘डिलिट‘ झाल्याचे पाहून अनेकांना धक्‍का बसला. मयत, दुबार नोंदणीची नावे डिलिट करण्यात आल्याचे कारण सांगण्यात आले. पण ‘आम्ही जिवंत असून आम्हाला मारणारे तुम्ही कोण?’ असा सवाल मतदारांनी केंद्रप्रमुखांसमोर उपस्थित केला. असे वादावादीचे प्रसंग घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. कनाननगरातील स्नेहानंद काळे (वय 55) यांनी मागील निवडणुकीत इस्तेर पॅटर्न शाळेत मतदानाचा हक्‍क बजावला होता. यंदाही ते याठिकाणी आले. मतदान केंद्राबाहेर असणार्‍या बूथवर त्यांनी नाव तपासले. यावेळी एकाने त्यांच्याकडे न पाहता ‘हे मयत झालेत, नाव डिलिट केलंय’, अशी माहिती दिली.  मेलेत कसे काय? मी तुमच्या समोर उभा आहे ना. त्यांचे उत्तर ऐकून तोही चाचपडला. त्यांनी ही बाब सामाजिक कार्यकर्ते शशिकांत रणवरे यांच्या निदर्शनास आणून दिली. दोघांनीही मतदान केंद्रात जाऊन चौकशी करण्यास सांगितले. याठिकाणीही त्यांना मतदार यादीतून नाव डिलिट झाल्याची माहिती देऊन बोळवण करण्यात आली. पुढील निवडणुकीपुर्वी याची दुरुस्ती झालीच पाहिजे, असे खडे बोल केंद्रातील कर्मचार्‍यांना सुनावले.